Vakri Budh Gochar 2024: नवग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी त्याला एक महिना लागतो. नवग्रहांमध्ये बुधाचे संक्रमण अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. बुध हा बुद्धिमत्ता, शिक्षण, ज्ञान, बुद्धी, वाणी, प्रतिभा इत्यादींचा कारक ग्रह आहे. सध्या बुध मेष राशीत आहे आणि आज २ एप्रिलला बुध मेष राशीत वक्री चाल चालेल. बुधाच्या या चालीचा काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींचे भाग्य बुधाच्या या स्थितीमुळे चमकेल…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

वृषभ राशी

बुधदेवाचे वक्री होणे वृषभ राशींच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.  

Shukra Guru Yuti
वाईट काळ संपेल! मे पासून ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? १२ वर्षांनंतर शुक्र-गुरूची युती होताच होऊ शकतात मालामाल
3 April 2024 Panchang Horoscope Today
३ एप्रिलचे १२ राशींचे भविष्य व पंचांग: वृषभ, सिंहसह ‘या’ राशींचा आजचा दिवस असेल आनंदी; तुमची रास काय सांगते?
Surya And Guru Conjunction Marathi News
वाईट काळ संपेल! १३ एप्रिलपासून ‘या’ राशींसाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडणार? २ ग्रहांची युती होताच मिळू शकतो चांगला पैसा
Shani Vakri 2024
जूनपासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? शनिदेव वक्री अवस्थेत बलवान होताच १३९ दिवस मिळू शकतो अपार पैसा

मिथुन राशी

बुधदेवाचे वक्री होणे मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरु शकते. नोकरदार लोक जे नवीन नोकरीच्या शोधात असतील तर त्यांना नवीन संधी मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित काम पूर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात.

(हे ही वाचा : १०० वर्षांनी एकाचवेळी २ शुभ राजयोग घडणार; ९ एप्रिलपासून ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा? होऊ शकतात श्रीमंत)

सिंह राशी

बुधदेवाचे वक्री होणे सिंह राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला काही चांगल्या ऑफर्स मिळू शकतात. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात.

कुंभ राशी

बुधदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. नोकरीच्या क्षेत्रात तुम्हाला शुभ परिणाम मिळू शकतात. नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

मीन राशी

बुधदेवाचे वक्री होणे मीन राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येणारे ठरु शकते. यावेळी तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी भरपूर नफा मिळू शकतो. 

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)