Budhaditya Raj Yog In Scorpio: ज्योतिषशास्त्रात बुधादित्य राजयोग हा अतिशय शुभ योगांमध्ये गणला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग तयार होतो. त्या व्यक्तीला राजकारणात यश मिळते. यासोबतच त्यांची समाजातील लोकप्रियता वाढते. बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. ३ डिसेंबर २०२२ पर्यंत वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग राहील. ज्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसेल, पण ३ राशी आहेत, ज्यांना या योगाच्या प्रभावामुळे व्यवसायात नफा आणि करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ही राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मकर राशी

बुधादित्य राज योग तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. यासोबतच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. तुम्हाला व्यवसायात गुंतवणूक करायची असेल किंवा नवीन व्यवसाय उघडायचा असेल तर तुम्ही ते करू शकता. दुसरीकडे राजकारणात सक्रिय असलेल्यांना काही पद मिळू शकते. या दरम्यान तुमचे मनोबल वाढेल आणि तुमचा आत्मविश्वासही वाढेल. तुमची आर्थिक बाजूही पूर्वीपेक्षा मजबूत होईल. या काळात तुम्ही शेअर बाजारातून पैसेही कमवू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Budhaditya rajyog made in scorpion these zodiac sign get more money gps
First published on: 22-11-2022 at 19:45 IST