Cancer Yearly Horoscope 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र आहेत ज्याचा व्यक्तीच्या मानसिक स्थितीवर प्रभाव असतो. कर्क राशीच्या लोकांसाठी वर्ष २०२३मध्ये खूप चढ-उतार असलेले होते. कारण वर्षाच्या सुरुवातीलाच लोकांवर शनीची ढैय्या (अडीच वर्ष) सुरू झाली होती. दुसरीकडे, १ जानेवारी २०२३ रोजी तुमच्या गोचर कुंडलीत ग्रहांची स्थितीमध्ये भाग्यस्थानी राहु ग्रह आला आहे, त्यामुळे तुमचे नशीब उजळेल. केतू ग्रह तुमच्या शौर्याच्या स्थानी आहे, ज्यामुळे तुमचे शौर्य वाढेल. तुमच्या लोकप्रियतेत वाढ होईल. महिन्याच्या सुरुवातीला पाचव्या स्थानी लक्ष्मी नारायण योग तयार होईल. गुरु ग्रह कर्म स्थानी असून १ मे रोजी उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी प्रवेश करेल. सूर्य ग्रह सहाव्या स्थानी राहील, यामुळे शत्रूंचा नाश होईल. पण शनीदेव आठव्या स्थानी भ्रमण करत आहेत. त्यामुळे शनीची ढैय्या सुरू आहे ज्याचा तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असेल ते जाणून घेऊया…

कर्क राशीच्या लोकांचे काम आणि व्यवसाय
वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार कर्क राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने चांगले ठरू शकते. तुमचे उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. त्यामुळे या वर्षी धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. तेथे प्रलंबित कामे पूर्ण होतील. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळेल. व्यवसायात नफा दुप्पट होईल. तसेच उत्पन्नातही प्रचंड वाढ होईल. योजना यशस्वी होतील. गुंतवणुकीतून लाभ होईल. नवीन कामही सुरू करू शकता. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी राजकारणापासून दूर राहावे. तसेच, निष्काळजी होऊ नका. अन्यथा नुकसान होऊ शकते.

कर्क राशीची आर्थिक स्थिती
२०२४मध्ये कर्क राशीच्या लोकांची वर्षाच्या सुरुवातीला आर्थिक स्थितीमध्ये सुधारली जाऊ शकते. वाहन आणि प्रॉपर्टी तुम्हाला एप्रिल महिन्यामध्ये खरेदी करू शकता.

हेह वाचा – १० वर्षांनी ‘या’ राशींमध्ये नवपंचम राजयोग बनत असल्याने तुमच्या कुंडलीत काय बदलणार? धनलाभाचे मार्ग कोणते?

कर्क राशीचे करिअर आणि शिक्षण
कर्क राशीचे विद्यार्थांसाठी २०२४ चा जबरदस्त असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन शिकण्याची इच्छा आहे त्यांना मार्च महिन्यात संधी मिळू शकते. तसेच नोकरी परदेशामध्ये लागण्याची शक्यता. तसेच एप्रिलनंतर चांगला काळ आहे. कोर्समध्ये चांगले गुण मिळू शकतात. तसेच सरकारी नोकरीची तयारी करत आहे त्यांना चांगली नोकरी लागू शकते.

कर्क राशीच्या लोकांसाठी आरोग्य स्थिती
कर्क राशीच्या लोकांना फेब्रुवारी महिन्यात आरोग्याची विशेष काळजी घेतली पाहिजे. तसेच संपूर्ण आयुष्य लोकांना फेब्रुवारी महिन्यात आरोग्याच्या समस्यांची काळजी घेतली पाहिजे. हा काळ तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतो. एखादी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दुखापत होण्याची शक्यता आहे. फेब्रुवरी पर्यंत तुमची तुमच्या आरोग्याची जास्त काळजी घ्या. एखादी छोटी सर्जरी देखील करावी लागू शकते. तुम्हाला १६ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यायची आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.

कर्क राशीच्या लोकांचे वैवाहिक जीवन २०२४
वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार, या वर्षी कर्क राशींच्या लोकांचे प्रेम संबध आणि वैवाहिक जीवनामध्ये थोडा चढ-उतार होऊ शकतो. प्रेम संबधामध्ये नाराजी येऊ शकते. पण मे महिन्यांनतर गोष्टी चांगल्या होतील.

हेही वाचा – १ हजार वर्षांनी बनतोय ‘शुभयोग; २०२४ मध्ये ‘या’ ३ राशींवर शनिदेवाची कृपा? गुरू ग्रह देऊ शकतात श्रीमंत बनण्याची संधी

काय करावे उपाय?
कर्क राशीच्या लोकांना शनी देवाचीआराधना करण्याचा सल्ला दिला जातो. तसेच भगवान शंकराची आणि हनुमानाची पुजा करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)