Chanakya Neeti : आचार्य चाणक्य ज्यांना कौटिल्य आणि विष्णुगुप्त म्हणून ओळखले जाते, ते चंद्रगुप्त मौर्याचे महामंत्री होते आणि त्यांनी मौर्य साम्राज्याच्या स्थापनेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. चाणक्य हे एक महान नेत्यांपैकी एक होते, ज्यांना भारताच्या राजनीतिचे जनक मानले जाते. आचार्य चाणक्य यांच्या नीती शास्त्रामध्ये जीवनातील प्रत्येक वेगवेगळ्या पैलूंविषयी सांगितले आहे. त्यांच्या नीती जीवन जगण्याची कला शिकवतात. तुम्हाला पण चाणक्य यांच्या प्रमाणे बुद्धी आणि रणनीतिक विचार हवे असेल तर चाणक्य यांच्या या पाच नीती नेहमी लक्षात ठेवाव्या.
नवीन गोष्टी जाणून घेण्याची किंवा शिकण्याची इच्छा
चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीला नेहमी नवीन गोष्टी जाणून घ्यायची किंवा शिकण्याची आवड असायला हवी. ज्या लोकांना कोणत्याही गोष्टीचे खूप कुतुहल असतात, ते इतर लोकांच्या तुलनेत अतिशय बुद्धिमान असतात. त्यांची बुद्धी नेहमी सक्रिय असते.
पौष्टिक अन्नाचे सेवन
आचार्य चाणक्य यांच्या नीतिनुसार, तेज बुद्धीसाठी एक व्यक्ती शारीरिकदृष्ट्या निरोगी राहणे सुद्धा गरजेचे आहे. त्यासाठी पौष्टिक अन्नाचे सेवन करणे खूप महत्त्वाचे आहे. हे शरीराबरोबर व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असते.
व्यायाम आणि योग
चाणक्य नीतिनुसार, बुद्धी ही तेज बनवण्यासाठी नियमित योग किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे. योग आणि व्यायाम शरीराला तंदुरुस्त आणि उत्साही ठेवते. तसेच बुद्धाला आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यास सक्रिय करते.
ध्यान
चाणक्य यांच्या मते, जर तुम्हाला तुमची बुद्धी तीक्ष्ण बनवायची असेल, तर नियमित ध्यान करा. तसेच सकाळी १५ ते २० मिनिटे ध्यान केल्याने बुद्धीला चालना मिळते. मेडिटेशनमुळे व्यक्तीचा तणाव कमी होऊ शकतो तसेच लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढू शकते.
बौद्धिक खेळ
चाणक्यनुसार, नीतीशास्त्रामध्ये सांगितले आहे की काही खेळ हे फक्त मनोरंजनासाठी नसतात तर त्यामुळे बौद्धिक कार्यक्षमता सुधारण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा बनवले जातात. जसे की बुद्धीबळ, इत्यादी. हे खेळ खेळण्याचे बुद्धीला शांतता मिळते. तसेच लक्ष केंद्रित करण्यासाठी विचार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आणि राजनितीक प्लॅन बनवण्यासाठी मदत करतात ज्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)