Chanakya Niti for Life:  आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीतीमध्ये जीवनातील अनेक पैलूंबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यांनी यात एखाद्या व्यक्तीच्या अशी काही सवयींविषयी सांगितले आहे, ज्यामुळे ती व्यक्ती कितीही शिक्षित असली तर समाज तिला मूर्ख समजते. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती असली तरी ते कधीच आनंदी नसतात, समाजात त्यांना मानसन्मान मिळत नाही. सतत अपमान सहन करावा लागतो ज्यामुळे त्यांची प्रतिष्ठा कमी होते. मरेपर्यंत त्यांना लाजिरवाणे जीवन जगावे लागते. पण त्यांना कोणत्या सवयींमुळे असे जीवन जगावे लागते जाणून घेऊ…

१) इतरांवर अवलंबून राहणे

इतरांवर अवलंबून असणारे लोक प्रत्येक गोष्टीसाठी इतरांची मदत घेत असतात, यामुळे नेहमीच त्यांना दुय्यम स्थान मिळते अशाने त्यांना लाजिरवाणे जीवन जगावे लागते. या लोकांना कधीही आदर मिळत नाही. उलट लोक त्यांच्याकडे तुच्छतेने पाहतात. तसेच ते समाजात कधीही मानवर करून जगू शकत नाहीत. म्हणून इतरांवर अवलंबून राहण्याऐवजी, स्वावलंबी राहून सन्मानाने जीवन जगले पाहिजे.

२) रागीष्ट लोक

जे लोक स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि कधीही काहीही बोलून जातात असे लोक स्वतःच्या हाताने स्वतःचा आदर गमावून बसतात. तसेच ते त्यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे स्वतःचे जीवन नरकात ढकलतात. असे लोक कोणालाही आवडत नाहीत. त्यांना मरेपर्यंत त्यांच्या रागवण्याची आणि कोणालाही रागात वाईट बोलण्याची लाज वाटू लागते.

३) मूर्ख आणि अज्ञानी व्यक्ती

जे मूर्ख आणि अज्ञानी असतात त्यांना प्रत्येक पावलावर अपमान सहन करावा लागतो. अशा लोकांचा कोणीही आदर करत नाही. उलट ते अनेकदा अशा चुका करतात की, ज्यामुळे त्यांना संपूर्ण आयुष्य लाजिरवाणे जीवन जगावे लागते.