Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे प्राचीन भारतातील एक अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व होते. त्यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त या नावांनीही ओळखले जाते. ते राजनीती, अर्थशास्त्रमध्ये तज्ज्ञ होते. चाणक्य नीती नावाचा त्यांचा ग्रंथ आहे जो नीतीशास्त्रावर आधारित आहे. या ग्रंथामध्ये आचार्य चाणक्य यांनी जीवनातील विविध पैलुंविषयी सांगितले आहे. विशेषत: धन संपत्ती, यश आणि व्यक्तिमत्त्वाविषयी त्यांनी त्यांच्या नीतीद्वारे खूप चांगले मार्गदर्शन केले आहे. चाणक्य यांच्या नीती आयुष्यात विविध टप्प्यांवर उपयोग पडतात. आजही अनेक लोक त्यांच्या नीतीचे अनुकरण करताना दिसतात.
चाणक्य यांनी आर्थिक बाबींविषयी सुद्धा त्यांच्या नीतीमध्ये सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, ४ प्रकारच्या लोकांजवळ कधीही पैसा टिकत नाही. त्यांच्या स्वभाव, वागणूक किंवा सवयीमुळे संपत्ती त्यांच्याजवळ येऊन सुद्धा हातातून निघून जाते. त्यांच्या मते, हे लोक आयुष्यभर आर्थिक समस्यांचा सामना करतात. या लोकांच्या काही सवयी असतात, ज्यामुळे लक्ष्मी माता या लोकांपासून नाराज राहते. आज आपण त्या चार प्रकारच्या लोकांविषयी जाणून घेणार आहोत.
जे लोक स्वच्छता राखत नाही
आचार्य चाणक्य यांच्या मते, जे लोक स्वच्छता ठेवत नाही. जे लोक अस्वच्छ कपडे घालतात, त्यांच्याजवळ पैसा टिकत नाही. माता लक्ष्मीला स्वच्छता प्रिय लोक आवडतात आणि अस्वच्छतेपासून ते दूर राहतात.
दात स्वच्छ ठेवत नाही
आचार्च चाणक्य यांच्या मते, जे लोक दात स्वच्छ ठेवत नाही किंवा ज्यांचे दात निरोगी नाही, अशा लोकांजवळ पैसा टिकत नाही. माता लक्ष्मी अशा लोकांवर नेहमी नाराज राहते.
भुकेलेल्या स्वभावाची व्यक्ती
जी व्यक्ती भूकेपेक्षा जास्त जेवण करते, ज्यांच्या मना नेहमी खाण्याविषयी लोभ असते, असे भुकेलेल्या स्वभावाचे लोक धन संपत्ती सांभाळू शकत नाही. माता लक्ष्मीला असे लोक आवडत नाही
खूप जास्त झोपणारे लोक
चाणक्य यांच्या मते, जे लोक सूर्योदयापासून सू्र्यास्तापर्यंत झोपतात ते आळशी असतात. हे लोक नेहमी आर्थिक संकटाचा सामना करतात. आळशीपणा यांच्यापासून चांगली संधी हिरावून घेतात
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)