आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात मानवी समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक धोरणे दिली आहेत. असे म्हणतात की जो व्यक्ती त्यांच्या धोरणांचे पालन करतो त्याच्या आयुष्यातील अनेक समस्या सहज सुटतात. ज्यांच्या पत्नींमध्ये ४ विशेष गुण असतात अशा पुरुषांसाठी नीतिशास्त्र भाग्यवान असल्याचे वर्णन केले आहे. आज आपण त्या ४ गुणांबद्दल बोलत आहोत…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पैशांची बचत करणारी
आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या स्त्रिया कठीण काळात पैसे वाचवतात, त्यांचे पती भाग्यवान असतात. अशी स्त्री तिच्या कुटुंबाचे सर्व कठीण प्रसंगी संरक्षण करते. तिने बचत केलेले पैसे कुटुंबाला संकटातून बाहेर काढण्यासाठी वापरले जातात. अशा महिलांचे व्यवस्थापनही चांगले असते.

आणखी वाचा : Dussehra 2022 : यावर्षी दसरा ४ की ५ ऑक्टोबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

धैर्यवान स्त्री
धीर धरणारी स्त्री कधीही पतीची साथ सोडत नाही. प्रत्येक परिस्थितीत ती पतीच्या खांद्याला खांदा लावून उभी असते. उलट अशी स्त्री आपल्या पतीला प्रत्येक कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी मदत करते. यामुळे पतीचे मनोबल वाढते आणि जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमी त्याचा हात धरते.

धार्मिक आणि सुसंस्कृत
चाणक्य नीतिनुसार अशी स्त्री जी शिक्षीत आणि सुसंस्कृत असते आणि तिला धार्मिक ग्रंथांचे ज्ञान असते. योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्यास सक्षम असते अशा महिला मुलांना सुसंस्कृतही बनवतात. ज्या घरात अशी स्त्री राहते, ते घर सदैव सुखी असते. मुलांमध्ये चांगले संस्कार घडवून कुटुंबाची रोपटीही चांगली तयार होतात.

आणखी वाचा : Chanakya Niti: घरात या ५ चुका करू नका, उध्वस्त होऊ शकतं आयुष्य!

शांत स्वभावाच्या स्त्रिया
ज्या व्यक्तीची पत्नी शांत स्वभावाची असते, ते भाग्यवान असतात. अशा लोकांवर देवी लक्ष्मीची विशेष कृपा राहते. अशी स्त्री घरात सुख-शांतीचे वातावरण राखते. अशी स्त्री प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या हुशारीने काम करते आणि कुटुंबाला उध्वस्त होण्यापासून वाचवते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chanakya niti husbend are lucky whose wife has these 4 qualities prp
First published on: 13-09-2022 at 11:37 IST