Chanakya Niti : आचार्य चाणक्य ही एक महान व्यक्ती होती. त्यांनी यशस्वी आणि आनंदी जीवन जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. अनेक जण त्यांच्या नीतीचे आजही अनुकरण करतात. चांगला विद्यार्थी कसा असतो आणि त्याने जीवनात कोणत्या गोष्टीचे पालन करावे, याविषयी चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये सविस्तर सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ.

  • वेळ ही कुणासाठीही थांबत नाही. त्यामुळे प्रत्येकाने वेळेचा आदर करावा. चाणक्य सांगतात की, विद्यार्थी जीवन हे खूप मौल्यवान असतं. यादरम्यान विद्यार्थ्यांनी वेळेचं महत्त्व जाणून घ्यावं आणि वेळेचा सदुपयोग करावा. विद्यार्थ्यांनी त्यांची सर्व कामं वेळेत पूर्ण करावीत.
  • शाळा आणि शिस्त यांचे घनिष्ठ नाते आहे. शालेय जीवनात शिस्त ही खूप महत्त्वाची आहे. शिस्तप्रिय विद्यार्थी आयुष्यात खूप पुढे जातात. चाणक्य नीतीमध्ये सांगितल्याप्रमाणे, एक चांगला विद्यार्थी हा नेहमी शिस्तप्रिय असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिस्तप्रिय राहून आपलं आयुष्य जगावं.

हेही वाचा : फेसबुक, इन्स्टाग्रामवर अनोळखी व्यक्तींबरोबर मैत्री करताना ‘या’ गोष्टींची घ्या काळजी….

  • माणसाची संगत नेहमी चांगली असावी, असे म्हणतात. वाईट संगत ही नेहमी व्यक्तीचा नाश करते. वाईट संगतीमुळे अनेकदा चांगली मुलेही बिघडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगल्या मुलांबरोबर मैत्री करावी. मित्र असे असावेत की, जे संकटाच्या वेळी तुम्हाला मदत करतील आणि तुम्हाला एकट्याला सोडून जाणार नाहीत.
  • व्यसन कोणतेही असो ते लहानांपासून मोठ्यांपर्यंत कुणासाठीही चांगले नाही. विद्यार्थी जीवनात कोणत्याही वाईट गोष्टींची सवय लावून घेऊ नये; नाही तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दिसून येतो.
    आचार्य चाणक्यांनी सांगितल्यानुसार विद्यार्थ्यांनी व्यसनापासून नेहमी दूर राहावे. कोणतेही व्यसन शरीरासाठी चांगले नसते. त्यामुळे विद्यार्थी चुकीच्या मार्गाने जाऊ शकतात आणि ध्येयापासून विचलित होऊ शकतात.
  • असे म्हणतात, ‘आळस हा माणसाचा सर्वांत मोठा शत्रू आहे.’ चाणक्य यांनी त्यांच्या नीतीद्वारे विद्यार्थ्यांना आळसापासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. चाणक्य सांगतात की, जे विद्यार्थी आळशी असतात; ते कधीही आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाहीत.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.