scorecardresearch

या ५ सवयींमुळे माणूस होऊ शकतो कंगाल, जाणून घ्या काय म्हटलंय चाणक्य नीतिमध्ये ?

आचार्य चाणक्यांनी माणसाच्या काही अशा सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे माणूस गरीब होतो. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर चाणक्यजींच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

chanakya-neeti

CHANAKYA NITI IN MARATHI : महान रणनीतीकार आचार्य चाणक्य यांनी समाजाच्या कल्याणासाठी धोरण तयार केले होते. या धोरणात संपत्ती, शिक्षण, वैवाहिक जीवन, कौटुंबिक संबंध, मित्र-शत्रू यासह प्रत्येक विषयावर सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आचार्य चाणक्यांची धोरणं सध्याच्या काळातही प्रासंगिक मानली जातात. असं म्हणतात की जो व्यक्ती आपल्या जीवनात त्याची धोरणे स्वीकारतो, त्याचे ध्येय साध्य होण्याची शक्यता वाढते.

या नीतिमध्ये चाणक्यांनी माणसाच्या काही अशा सवयी सांगितल्या आहेत, ज्यामुळे माणूस गरीब होतो आणि देवी लक्ष्मीही त्याला सोडून जाते. त्यामुळे तुम्हालाही तुमच्या आयुष्यात श्रीमंत व्हायचं असेल तर चाणक्यजींच्या या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.

अप्रमाणित खर्च करणारा:
आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जो व्यक्ती आपल्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करतो किंवा जो अनावश्यकपणे पैसे खर्च करतो, तो व्यक्ती नेहमी त्रासलेला असतो. आचार्य चाणक्य यांच्या मते, जीवनात पैसा जमा करणे आणि बचत करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ते तुम्हाला कठीण काळात साथ देते. जर एखादी व्यक्ती अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करते, तर देवी लक्ष्मी देखील त्याच्यावर कोपते.

आणखी वाचा : समुद्रशास्त्र : कानाच्या आकारावरून जाणून घ्या व्यक्तिमत्व आणि भविष्याशी संबंधित या खास गोष्टी

चुकीची संगत:
चाणक्यजी सांगतात की ज्या लोकांचा सहवास चुकीचा आहे, ते धनाची देवी लक्ष्मीच्या कृपेपासून वंचित राहतात. कारण चुकीच्या संगतीचा परिणाम माणसावर खूप होतो. अशा लोकांना त्यांच्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

विश्वासघात करणारे :
जी व्यक्ती इतरांची फसवणूक करते किंवा पाठीमागून वार करतात, अशा लोकांना समाजातून कधीच सन्मान मिळत नाही. अशा लोकांना पैसे मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. कारण देवी लक्ष्मी त्यांना साथ देत नाही.

आणखी वाचा : शक्ती आणि पराक्रम देणारा मंगळ धनु राशीत प्रवेश करेल, या ३ राशींना मिळणार लाभ

खोटं बोलणारे :
आचार्य चाणक्यजी यांनी सांगितले की जो व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी खोटं बोलतो, त्याच्यावर देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. कारण अशा लोकांना समाजात अनेकदा लाजही पत्करावी लागते.

ज्येष्ठांचा अपमान :
चाणक्यजींनी सांगितले की, जे वृद्धांचा आदर करत नाहीत, त्यांचे शरीरात गरिबी येते. त्याचवेळी देवी लक्ष्मीही त्याच्यावर कोपते.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chanakya niti these habit of your can make you poor know what chanakya neeti says prp 93

ताज्या बातम्या