Chanakya Niti : आचार्य चाणक्य अर्थशास्त्रज्ञ, राजकीय विचारवंत आणि मौर्य साम्राज्याचे मुख्य सल्लागार होते. त्यांनी धर्म, न्याय, संस्कृती, शासन आणि अर्थशास्त्र, शिक्षण इत्यादीविषयी सविस्तर लिहिले आहे. चाणक्य यांनी अर्थशास्त्र नावाचा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आहे. त्यांनी नीती शास्त्रावर आपले विचार मांडले आहे. त्यांनी सांगितलेल्या नीती व्यक्तीला आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शन करण्यास मदत करतात. त्यांनी सांगितलेल्या नीति आजही अनेक फॉलो करतात.
आचार्य चाणक्य यांनी नीतिशास्त्रामध्ये आयुष्य जगण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी काही नीति सांगितल्या आहे. पण चाणक्य यांच्या मते काही लोक असे असतात ज्यांना सल्ला देण, हा मुर्खपणा असतो. त्यांच्यावर कोणताही प्रभाव पडत नाही. ते लोक कोण आहेत, हे जाणून घेऊ या.
चाणक्य नीतिनुसार, कोणते ३ लोक कधीही सुधरू शकत नाही
लोभी व्यक्ती –
आचार्य चाणक्यनुसार, लोभी लोकांना सल्ला देणे म्हणजे आपल्या पायावर कुऱ्हाड मारणे सारखे आहे. कारण जेव्हा कोणी योग्य मार्ग दाखवत असेल, तर ते लोक त्यांना आपला शत्रू मानतात. ते कोणतेही काम या बदल्यात आपल्याला काय मिळणार या भावनेने करतात. या प्रकारचे लोक तेव्हाच काम करतात जेव्हा त्यांना फायदा दिसतो. ते तुमच्या सल्ल्याने तुमचे नुकसान करू शकतात. त्यांच्याकडे लक्ष देऊ नये आणि त्यांना कोणताही सल्ला देऊ नये.
अहंकारी व्यक्ती –
अहंकारी व्यक्ती स्वतःला खूप श्रेष्ठ समजतात आणि इतरांचा सल्ला निरुपयोगी मानतात. या लोकांना जे हवे आहे, ते करायला आवडते. त्यांना त्यांच्या पदाचा, यशाचा, पैशाचा खूप गर्व असतो. त्यामुळे ते इतरांच्या बोलण्याला फार महत्त्व देत नाही. ते अनेकदा सल्ला देणाऱ्या व्यक्तीचा अपमान करतात. त्यामुळे त्यांना सल्ला देणे टाळावे.
मूर्ख व्यक्ती –
चांगल्या गोष्टी समजून घेणे मुर्खांच्या विचारापलीकडे आहे. मुर्ख व्यक्तीला सल्ला देणे पूर्ण पणे व्यर्थ असते. ते आपली कोणतीही चांगली गोष्ट समजू शकत नाही. त्यामुळे ते जीवनात कधीही या गोष्टी अंगीकारू शकत नाही. अशा लोकांना सल्ला देणे, मार्ग दाखवणे म्हणजे ऊर्जा वाया घालवण्यासारखे आहे.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)