Chanakya Niti News : आचार्य चाणक्य हे उत्तम राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी होते. चाणक्य यांनी मांडलेल्या चाणक्य नीतीमध्ये माणसाने आयुष्य कसे जगावे? याविषयी मार्गदर्शन केले आहे. माणसाचे आयुष्य सोपी आणि सुखी करण्यासाठी त्यांनी काही नीती सांगितल्या आहेत. त्यांच्या नीती या जगप्रसिद्ध आहेत. अनेक राजकारणी, व्यावसायिक त्यांच्या नीतिंचे अनुकरण करतात. चाणक्य यांच्या मते, माणसाची खरी संपत्ती म्हणजे पैसा किंवा सोने नाही. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की माणसाची खरी संपत्ती कोणती? आचार्य चाणक्य यांनी याविषयी त्यांच्या नीतिमध्ये सांगितले आहे. आज आपण त्याविषयीच जाणून घेऊ या.

माणसाची खरी संपत्ती कोणती? (Chanakya Niti : Real Wealth of Man)

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीमध्ये धन-संपत्तीचा उल्लेख केला आहे. संपत्ती किंवा धन जमा करण्याच्या नादात माणूस अनेकदा पैसा आणि सोन्याच्या मागे पळतो; पण चाणक्य सांगतात की पैसा किंवा सोने खरी संपत्ती नाही.
माणसाची खरी संपत्ती ही ज्ञान आणि इच्छाशक्ती आहे. जी व्यक्ती अज्ञानी आहे, ती श्रीमंत बनू शकत नाही. याशिवाय चाणक्य पुढे सांगतात, ज्या व्यक्तीकडे ज्ञान आणि प्रबळ इच्छाशक्ती आहे, ते कोणत्याही कठीण संकटातून मार्ग काढू शकतात.

ज्यांच्याकडे ज्ञान आणि इच्छाशक्तीसारखी संपत्ती आहे, असे लोक प्रत्येक कठीण प्रसंगाचा सामना करू शकतात. बुद्धिमान व्यक्ती ही त्यांच्या ज्ञानामुळे सगळीकडे नाव लौकिक कमावतात.

ज्ञानाने परिपूर्ण असणारी बुद्धिमान व्यक्ती नेहमी चांगले कर्म करतात आणि इतरांनाही चांगले काम करण्यासाठी प्रेरित करतात. चाणक्य नीतीनुसार असे लोक कधीही वाईट संगतीमध्ये दिसून येत नाही.

जी व्यक्ती खरोखर ज्ञानी आहे, त्यांना कधीही कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसतो. अज्ञानी लोकांमध्ये नेहमी मोह, लोभ आणि राग दिसून येतो.

चाणक्य सांगतात की, व्यक्तीने सतत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्ञान मिळवण्यासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते. माणसाने नियमित नवनवीन गोष्टी शिकायला पाहिजे आणि हे ज्ञान इतरांना शेअर केले पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)