Shani Margi & Chandra Grahan 2022: ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा ग्रह तारे आपले स्थान बदलतात तेव्हा त्याचा परिणाम मानवी जीवनावरही दिसून येतो. पंचांगानुसार ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या दिवशी चंद्राने आपल्या स्थानावरून मार्गक्रमण करून मकर राशीत प्रवेश घेतला आहे. विशेष म्हणजे मकर राशीत अगोदरच शनिदेव विराजमान आहेत तर ३० ऑक्टोबरलाच मकर राशीत मंगळ सुद्धा वक्री झाला आहे. परिणामी चंद्र, शनि व मंगळ अशा शक्तिशाली ग्रहांनी एकत्र येऊन एक खास त्रिकुट योग जुळवून आणला आहे. अशातच आता ८ नोव्हेंबरला चंद्र ग्रहण लागणार असल्याने हा योग अशुभ ठरणार आहे.

८ नोव्हेंबर २०२२ या दिवशी यावर्षात शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण असेल. या चंद्रग्रहणाचा सर्व राशींवर परिणाम होणार आहे. दुपारी २ वाजून ३९ मिनिटांनी वाजता सुरू होणारे हे चंद्रग्रहण संध्याकाळी ६ वाजून १९ मिनिटांपर्यंत कायम असेल. दरम्यान, चंद्राच्या ग्रहणाने होणारा परिणाम व चंद्र, शनि, मंगळ यांनी एकत्र येऊन तयार केलेला त्रिमुखी विष योग ३ राशींसाठी अशुभ ठरण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांनी काय काळजी घेणे आवश्यक आहे जाणून घ्या..

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
Budh Gochar Till 9 April 2024 Kendra Trikon Rajyog To Bless Vrushbh Makar Rashi
१३ दिवस केंद्र त्रिकोण राजयोग कायम; ‘या’ राशींना लाभतील सुगीचे दिवस; ‘या’ रूपात होईल लक्ष्मीचं आगमन
27 March Daily Mesh To Meen Rashi Bhavishya
२७ मार्च पंचांग, राशी भविष्य: कुणाच्या नशिबी नात्यांचं प्रेम, सुख व गोडवा तर कुणाची वाढेल डोकेदुखी, आज काय होणार?

मिथुन: चंद्र, शनि व मंगळ यांनी एकत्र तयार केलेला विष योग हा मिथुन राशीसाठी अशुभ ठरू शकतो. मिथुन राशीच्या व्यक्तींच्या कुंडलीत विष योग हा आठव्या स्थानी निर्माण होणार आहे. विष योगाने आपल्याला आर्थिक व आरोग्याच्या संबंधित समस्या उद्भवू शकतात. गुप्त रोगांची बांधा होण्याची शक्यता प्रबळ आहे. या काळात कोणतेही नवे उपक्रम सुरु करणे टाळणे हिताचे ठरू शकते. तुमच्या नोकरीच्याबाबत अजिबात बेजबाबदारपणा दाखवू नये, गुंतवणूक करताना किंवा उधार देताना किमान दोनदा विचार करावा. तुमच्या जोडीदाराशी लहानसहान गोष्टींवरून वाद घालणे टाळावे.

सिंह: सिंह राशीच्या कुंडलीत विष योग हा सहाव्या स्थानी तयार होत आहे. हे स्थान क्रोधवर्धक मानले जाते. तुम्हाला शत्रूच नव्हे तर मित्रांपासूनही जपून राहण्याची गरज आहे. विशेषतः कामाच्या ठिकाणी काहीजण तुमचे पाय ओढण्याचा प्रयत्न करू शकतात त्यांच्याशी वाद घालण्यापेक्षा तुम्हाला ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे. शक्य झाल्यास या काळात प्रवास करणे टाळणे हिताचे ठरेल. जर तुम्ही एखादी गुंतवणूक करत असाल तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.

२०२३ मध्ये भयंकर प्रलयाचे संकेत! बाबा वेंगा यांच्या ‘या’ ५ भविष्यवाण्या खऱ्या झाल्या तर आपलंही आयुष्य..

कुंभ : कुंभ राशीला विष योगाचा अगदी जवळून सामना करावा लागू शकतो. कुंभ राशीच्या कुंडलीत विष योग दुसऱ्याच स्थानी तयार होत आहे. हे स्थान धन व वाणीशी संबंधित आहे. तुम्हाला धन जपून ठेवायला हवे मात्र तुम्ही कोणत्या माध्यमातून धन जतन करत आहात हे ही तपासून घ्या. अनिश्चित माध्यमांचा धोका पत्करण्याऐवजी ओळखीच्या व विश्वासू व्यक्तीचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी. आपला आवाज जपा. आरोग्याची विशेषतः गळ्याची काळजी घ्या.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)