Chandra Rashi Parivartan In Kumbha Rashi 2025: हिंदू धर्मात १२ महिने प्रत्येक देवी-देवतांना समर्पित आहेत. त्यामुळे श्रावण महिन्याप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यालाही तितकेच महत्व आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी महालक्ष्मी मातेचे खास व्रत वैकल्यं केले जाते. धार्मिक मान्यतेनुसार, या व्रताचं पालन केल्यानं भक्तांना लक्ष्मी देवीची कृपा यासोबतच ऐश्वर्य, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यंदा २१ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याची सुरूवात होणार असून २७ नोव्हेंबर रोजी मार्गशीर्षातील पहिला गुरूवार आहे. या दिवशी घरोघरी देवी लक्ष्मीची पूजा केली जाईल. दरम्यान, ज्योतिष शास्त्रानुसारही हा दिवस अत्यंत खास आणि शुभ मानला जाईल. कारण, या दिवशी चंद्राचे शनीच्या राशीत गोचर होईल.
पंचांगानुसार, २७ नोव्हेंबर २०२५ रोजी चंद्र दुपारी ०२ वाजून ०६ मिनिटांनी मकर राशीतून कुंभ राशीमध्ये प्रवेश करेल. चंद्राचा शनीच्या राशीतील प्रवेश काही राशीच्या लोकांसाठी लाभकारी सिद्ध होईल.
चंद्राचे राशी परिवर्तन ‘या’ तीन राशींना करणार मालामाल
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राचे राशी परिवर्तन खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.
वृश्चिक (Vruschik Rashi)
चंद्राचे राशी परिवर्तन वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी चंद्राच्या राशी परिवर्तनाचे अनेक लाभकारी परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबातील वाद मिटतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कामच्या ठिकाणी सहकार्यांची मदत मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरी-व्यवसायात पदोन्नती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. कुटुंबातील जुने वाद मिटतील, आनंदाचे वातावरण असेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
