- मेष : कामात स्त्रियांची मदत मिळेल. इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष राहील. व्यावसायिक गोष्टींना अधिक महत्व द्याल. आपले अस्तित्व दाखवून द्याल. सत्ता मिळवण्याचा प्रयत्न कराल.
- वृषभ : स्वभावात काहीसा मानीपणा येईल. महत्वाकांक्षा वाढीस लागेल. आपला दर्जा टिकविण्याचा प्रयत्न कराल. प्रयत्नात कसूर करू नका. जोडीदाराला समजून घ्यावे.
- मिथुन : काही गोष्टी पूर्ण होण्यास पुरेसा वेळ द्यावा. सकस अन्न घ्यावे. प्रकृतीची हेळसांड करू नये. वैचारीक शांतता जपावी. कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल.
- कर्क : जोडीदाराचा निश्चय समजून घ्यावा. उच्च राहणीची आवड दर्शवाल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. मनमोकळ्या गप्पा माराल. मुलांच्या स्वछंदतेत वाढ होईल.
- सिंह : कामाचा चांगला उरक वाढेल. मानसिक शांतता लाभेल. विरोधकांवर मात करता येईल. कौटुंबिक सौख्य जपावे. जोडीदाराची कल्पकता दिसून येईल.
- कन्या : बौद्धिक दिमाख दाखवाल. मुलांच्या समस्या जाणून घ्याव्यात. कामातील खाचाखोचा जाणून घ्याव्यात. आपल्या बुद्धीचा सदुपयोग करता येईल. प्रवासात काळजी घ्यावी.
- तूळ : उत्कृष्ट व्यावसायिक लाभ होईल. अघळ-पघळ बोलाल. सारासार विचाराला प्राधान्य द्यावे. संभाषणाची आवड पूर्ण कराल. घरात मित्रांचा गोतावळा जमवाल.
- वृश्चिक : चौकसपणे गोष्टी जाणून घ्याव्यात. योग्य तर्क काढता येईल. प्रगतीच्या दृष्टीने काही गोष्टींचे चिंतन करावे. बोलताना भान राखावे. भावंडांची मदत होईल.
- धनू : दिवस गप्पांमध्ये व्यतीत कराल. आपल्या मतावर ठाम राहाल. कमिशनमधून फायदा मिळेल. व्यावहारिक चातुर्य दाखवाल. हसत-खेळत कामे कराल.
- मकर : आपल्या भावना उत्तम रीतीने मांडाल. स्मरणशक्तीचा वापर करता येईल. वागण्यात धूर्तपणा दाखवाल. आपल्या मतावर आग्रही राहाल. हजरजबाबीपणे बोलणे ठेवाल.
- कुंभ : जामीनकीचे व्यवहार तूर्तास बाजूला ठेवावेत. रहस्यमय गोष्टींची आवड दर्शवाल. प्रवासाची आवड पूर्ण करता येईल. फसवणुकीपासून सावध राहावे. कागदपत्रांची योग्य छानणी करावी.
- मीन : मोठ्या लोकांशी मैत्री होईल. लहान मुलांच्यात रमून जाल. गप्पिष्ट मित्रांचा सहवास लाभेल. व्यापारात चांगला लाभ होईल. आपल्या ज्ञानात भर पडेल.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 9th Jan 2021 रोजी प्रकाशित
आजचं राशीभविष्य, शनिवार, ०९ जानेवारी २०२१
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 09-01-2021 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily astrology horoscope saturday 09 january 2021 aau