1. मेष : अपेक्षित पत्रे हाती पडतील. छोटे प्रवास कराल. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने आजचादिवस अनुकूल. पूर्वी केलेल्या गुंतवणूकीतून लाभ होतील. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील.
  2. वृषभ : भावंडाचे सहकार्य लाभेल. महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. शोभेच्या वस्तूंची खरेदी कराल. समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मनाजोगे काम मिळेल.
  3. मिथुन : मानसिक स्थैर्य लाभेल. महत्वाची कामे मार्गी लागतील. आजचा दिवस खरेदीसाठी अनुकूल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या  तरुणांना चांगल्या संधी लाभतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल.
  4. कर्क : आपण घेतलेले निर्णय सभोवतालच्या व्यक्तींना पटतीलच असे नाही. अनेपक्षितगाठभेटी घडतील. आपल्या व्यक्तीमत्त्वाचा चांगला ठसा उमटेल. वाजवी ध्येय प्राप्त करु शकाल.
  5. सिंह : मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. इच्छापूती होईल. आरोग्याच्या जुन्या तक्रारी डोकेवर काढतील. नेत्रविकार, उष्णतेचे विकार यांच्यापासून त्रास होण्याची शक्यता आहे.
  6. कन्या : वरिष्ठ आपल्या आवडीच्या कामाची जबाबदारी देतील. महत्वाची कामे मार्गी लागतील. आपली कर्तव्ये पार पाडाल. विवाहेच्छुक तरुणांचे परिचयोत्तर विवाह ठरतील. घरात मंगलकार्याची नांदी होईल.
  7. तूळ : जोडीदाराची प्रगतीकारक घटना कानी येईल. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकुल. छोटे प्रवास कराल. व्यापार-व्यवसायात नफा होईल. तात्पुरत्या स्वरुपात काही अडचणी निर्माण होऊ शकतात. चांगल्या व्यक्तींची भेट होईल.
  8. वृश्चिक : व्यवसायातील महत्वाचे निर्णय टाळावेत. संततीसंबंधी एखादी सुवार्ता कानी येईल. कुटुंबातील व्यक्तीला योग्य सल्ला दिल्यामुळे घरात आपले महत्व वाढेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक उत्कर्ष साधता येईल. संशोधनपर अभ्यासक्रमातून चांगले यश संभवते.
  9. धनु : व्यावसायिक उत्कर्षाच्या दृष्टीने आजचा दिवस अनुकूल. आज आपल्याला वैवाहिक सौख्य लाभेल. सामाजिक कार्याबद्दल समाजात मान मिळेल. घरातील दुर्लक्षित कामांना वेळ देता येईल. गृहउद्योगातून लाभ होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.
  10. मकर : आपल्या आरोग्याच्या तक्रारी राहतील. आपल्याला शत्रुपीडा जाणवेल. महत्वाची कामे टाळावीत. स्वतःची प्रतिष्ठा वाढविण्याकरीता सतत प्रयत्नशील राहाल. आपले मनोधैर्य वाढेल.
  11. कुंभ : संततीच्या उत्कर्षाच्या सुवार्ता कानी येईल. नोकरीत आपल्याला महत्व प्राप्त होईल. अचानक विविध लाभ होण्याची शक्यता. व्यवसाय उद्योगातील जुनी येणी वसूल होतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या स्वीकाराल.
  12. मीन : आजचा दिवस वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने अनुकूल. कुटुंबात लागणाऱ्या महत्वाच्या वस्तूची खरेदी कराल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. प्रगतिपथावर मार्गक्रमण करण्यासाठी नवीन योजनांची आखणी केली जाईल.— ज्योतिषी विद्याधर करंदीकर
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily astrology horoscope tuesday 29 december 2020 aau
First published on: 29-12-2020 at 00:35 IST