- मेष:-
मनात नवीन आकांक्षा फुलतील. गृहसौख्याचा आनंद घ्याल. विचारांना सकारात्मकतेची जोड द्याल. मुलांचे म्हणणे समजून घ्यावे. महिलांनी घरातील ताण दूर करावा. - वृषभ:-
वाहन विषयक तक्रारी दूर कराव्यात. मंगल कार्यात भाग घ्याल. व्यावसायिक दृष्टीकोनातून सुट्टीचा विचार कराल. घर सजवण्यासाठी वेळ काढाल. मानहानीचे प्रसंग येवू शकतात. - मिथुन:-
घरासंबंधीच्या कामात अधिक लक्ष घालावे. नोकरदारांना कामाचा ताण जाणवेल. बढतीच्या कामाकडे लक्ष द्यावे. जोडीदाराला आर्थिक लाभ संभवतो. किरकोळ कटकटी दूर कराव्यात. - कर्क:-
वेगवेगळी सुखे आपल्या समोर येतील. हातातील कलेला उत्तम दिशा लाभेल. लेखन कलेला चांगला वाव मिळेल. मंगल कार्यात सहभाग नोंदवाल. घरासाठी विविध वस्तू खरेदी कराल. - सिंह:-
जोडीदाराच्या प्रेमात रंगून जाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कामाचा अति ताण घेवू नका. दगदगीपेक्षा स्थिर कामावर अधिक लक्ष द्यावे. उत्साहाच्या भारत शब्द देवू नका. - कन्या:-
झोपेची तक्रार जाणवेल. जनक्षोभात अडकू नका. एका वेळी अनेक कामे हाती घेणे टाळावे. आर्थिक चिंता मिटेल. काही गोष्टी मनाजोग्या घडतील. - तूळ:-
लपवाछपवी करावी लागेल. महत्त्वाची कागदपत्रे जपून ठेवावीत. खोट्या गोष्टींमध्ये अडकू नका. मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. बदलाकडे सकारात्मकतेने पहावे. - वृश्चिक:-
घरगुती कार्यक्रम मजेत पार पडेल. सरकारी कामे रेंगाळू शकतात. वरिष्ठांच्या नाराजीला बळी पडू नका. हट्टीपणा कमी करावा. अधिकारी व्यक्तीचे मार्गदर्शन घ्यावे. - धनु:-
प्रवासाचा योग येईल. वडिलधाऱ्यांचा सल्ला विचारात घ्यावा. सहकाऱ्यांना बरोबर घेवून चालावे. चिकाटी सोडून चालणार नाही. इतरांसमोर आपली कला सादर करण्याचा योग येईल. - मकर:-
तिखट व तामसी पदार्थ खाणे टाळावे. पाठीचे विकार त्रास देवू शकतात. महत्त्वाच्या कामात प्रथम लक्ष घालावे. प्रकृतीची हेळसांड करू नका. इतरांच्या मताला योग्य वाव द्याल. - कुंभ:-
तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कामाची घाई राहील. जोडीदाराविषयी गैरसमजाला मनात थारा देवू नये. कफविकार जाणवू शकतात. कौटुंबिक शांततेवर लक्ष द्यावे. - मीन:-
पत्नीशी मनमोकळ्या गप्पा माराल. भागीदारीत चांगला फायदा संभवतो. व्यवहारात्मक दृष्टीकोन ठेवावा. कमिशनच्या कामातून फायदा संभवतो. तुमचा जनसंपर्क वाढेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 13th Sep 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १३ सप्टेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 13-09-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 13 september 2019 aau