- मेष:-
काहीतरी नवीन करण्याचा विचार कराल. मन:स्वाथ्य कायम ठेवून कार्य करावे. आततायीपणे वागून चालणार नाही. क्षुल्लक गोष्टींना फार महत्व देऊ नका. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. - वृषभ:-
खोळंबलेली कामे मार्गी लागतील. मित्रांकडून अनपेक्षित टोला बसू शकतो. चटकन कोणावरही विश्वास ठेऊ नका. जुने ग्रंथ हाताळले जातील. सामुदायिक गोष्टीत फार लक्ष घालू नका. - मिथुन:-
स्वत:च्या विचारांना स्थिर ठेवा. जोडीदाराचा सल्ला ऐकावा. जुन्या मित्रांशी भेटीचा अथवा फोनवरून संपर्क होण्याची शक्यता. तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आपल्या योजना गुप्त ठेवाल. - कर्क:-
घरातील जबाबदारी पेलताना दमणूक होईल. आहारात पथ्ये पाळावीत. काही गोष्टींची गुप्तता पाळाल. ज्येष्ठ व्यक्तींचे सहकार्य घ्यावे. कार्यक्षेत्रात परिवर्तन घडून येईल. - सिंह:-
नवीन कार्याला चालना मिळेल. तुमच्या शब्दाला मान लाभेल. बौद्धिक चुणूक दाखवाल. आपल्याच मतावर ठाम राहाल. दिवस आनंदात जाईल. - कन्या:-
घरातील बरीच कामे मार्गी लागतील. जोडीदाराशी सामंजस्याने वागावे. मनातील निराशा दूर करावी. तुमच्यातील कलेला कौतुकाची थाप मिळेल. क्षुल्लक अपेक्षाभंगाने खचून जाऊ नका. - तूळ:-
हातून चांगले काम होईल. घरामध्ये शांत राहावे. महत्त्वाचे निर्णय गांभीर्याने घ्यावेत. आपल्यामुळे कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या. कामाची नवीन जबाबदारी अंगावर पडेल. - वृश्चिक:-
कमिशनच्या कामातून चांगली कमाई कराल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठांची कौतुकाची थाप पाठीवर पडेल. देणी फेडता येतील. तुमच्या कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. - धनू:-
हातून चांगली कामे होतील. गरज नसेल तर खर्च टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवा. आत्मविश्वास वाढीस लागेल. नियोजनाने कामे सुलभ होतील. - मकर:-
अति विचार करू नका. धार्मिक गोष्टीत मन रमवावे. कौटुंबिक गोष्टी सबुरीने घ्याव्यात. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. मुलांबरोबर संवाद साधावा. - कुंभ:-
मुलांबरोबर खेळ खेळावेत. प्रेमसंबंध अधिक दृढ करावेत. ध्येयाकडे लक्ष केन्द्रित करावे. भावंडांशी संवाद साधावा. कामाचा जोम वाढेल. - मीन:-
घरातील वातावरण शांततामय ठेवा. अधिकार बेताचाच वापरा. बोलताना तोल जाणार नाही याची काळजी घ्या. कामाचा विस्तार वाढवण्याचे ठरवाल. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 28th Aug 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 28-08-2020 at 00:29 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi friday 28th august 2020 aau