- मेष:-
घरासाठी काही खरेदी कराल. दिवसभर कामाची दगदग राहील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल. जुगारातून आर्थिक लाभ संभवतो. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळाल. - वृषभ:-
मुलांचा लहरीपणा जाणवेल. आरोग्यात सुधारणा होईल. जोडीदाराशी गप्पा-गोष्टी कराल. रागावर नियंत्रण ठेवावे. कौटुंबिक खर्च वाढेल. - मिथुन:-
कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. आपली पत-प्रतिष्ठा सांभाळावी. मित्रांचा गैरसमज दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नयेत. - कर्क:-
उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. हातातील अधिकाराचा वापर करावा. कामाचे समाधान लाभेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. करमणुकीत दिवस व्यतीत कराल. - सिंह:-
चोरांपासून सावध राहावे. कोणाचाही मत्सर करू नये. भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीला नावे ठेवू नका. आत्मविश्वास बाळगावा. - कन्या:-
क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वादविवादात अडकू नका. कामातील जोम वाढेल. तुमचे श्रम वाढू शकतात. - तूळ:-
श्रमामुळे थकवा जाणवू शकतो. काही कामे संथ गतीने होतील. अडथळ्यातून मार्ग काढाल. ध्यानधारणा करावी. कमिशनमधून फायदा संभवतो. - वृश्चिक:-
हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. चलाखीने कामे कराल. सर्वांशी गोडीने वागाल. तुमचा तर्क अचूक ठरेल. अंगीभूत कलेला प्रसिद्धी मिळेल. - धनु:-
प्रौढपणे विचार मांडाल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल. आवडीचे पदार्थ चाखायला मिळतील. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. मानसिक व्यग्रता जाणवेल. - मकर:-
दिवस आनंदात जाईल. कामात स्त्री वर्गाची मदत घ्याल. लहानात लहान होऊन खेळाल. सरकारी कामे वेळ खातील. वरिष्ठांना नाराज करू नका. - कुंभ:-
बोलण्याने सगळ्यांना जिंकून घ्याल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. काही कामे कमी श्रमात पार पडतील. मनातील इच्छा पूर्ण होईल. वाद-विवादात पडू नये. - मीन:-
चित्त एकाग्र करावे. सुप्त इच्छा पूर्ण होईल. व्यवसायातून चांगला लाभ होईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा होईल. उत्तम वाहन सौख्य लाभेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 4th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, ०४ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 04-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 04 november 2019 aau