- मेष:-
दिवस आनंदात घालवाल. काही गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. भागीदारीत समाधानी असाल. अचानक धनलाभ संभवतो. मनातून गैरसमज काढून टाकावा. - वृषभ:-
भावंडाना दूर गावी जावे लागेल. मानसिक चंचलता जाणवेल. सामाजिक बांधिलकी जपाल. आरोग्यात सुधारणा होईल. वैवाहिक सौख्याला बहर येईल. - मिथुन:-
घरात मंगलकार्ये होतील. उगाचच वादात अडकू नका. नसत्या चिंता करू नका. कचेरीच्या कामात अधिक वेळ जाईल. मैदानी खेळ खेळाल. - कर्क:-
कामाची धावपळ राहील. उत्तम व्यावसायिक वातावरण राहील. कामात एकसूत्रता ठेवावी. कौटुंबिक ताणतणाव वाढू शकतो. कलेला प्रोत्साहन मिळेल. - सिंह:-
हातातील कामाला यश येईल. बौद्धिक छंद जोपासाल. लहरीपणे वागाल. वरिष्ठांना खुश कराल. कोणाशीही वैर पत्करू नये. - कन्या:-
घरगुती जबाबदारी वाढेल. खर्चावर आवर घालावी लागेल. मनाजोगे सौख्य लाभेल. जमिनीच्या कामातून फायदा संभवतो. पत्नीची प्राप्ती वाढेल. - तूळ:-
कामाचा ताण वाढेल. शारीरिक कष्ट वाढू शकतात. जोमाने कामे हाती घ्याल. अडचणीतून मार्ग काढाल. किरकोळ दुखापती होऊ शकतात. - वृश्चिक:-
चैनीच्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक सौख्यात भर टाकाल. इतरांचा विश्वास संपादन करावा. घरात धार्मिक कार्य काढाल. प्रत्येक कामात आनंद शोधाल. - धनु:-
काही गोष्टींची गुप्तता पाळाल. काही गोष्टी क्षणिक जाणवतील. दिवस चैनीत घालवाल. कमिशनचा फायदा उठवाल. मोठ्या लोकांच्यात वावराल. - मकर:-
कामात चिकाटी सोडू नका. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल. आर्थिक चिंता मिटेल. अडचणींवर मात करावी. - कुंभ:-
उत्तम व्यावसायिक वातावरणात राहील. तुमच्यातील कलेला चांगला वाव मिळेल. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. तुमच्यातील चांगले गुण दिसून येतील. वरिष्ठांची मर्जी राखावी. - मीन:-
मनाची विशालता दाखवाल. भावंडांची प्रगती होईल. घरात कर्तेपणाचा मान मिळवाल. वादाचे मुद्दे बाजूला सारावेत. मनातून गैरसमज दूर करावेत.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 11th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, ११ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 11-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 11 november 2019 aau