- मेष:-
झोपेची तक्रार जाणवेल. खर्च काही प्रमाणात वाढू शकतो. लहानशा पराजयाने निराश होऊ नका. इतरांवर आपली छाप पाडाल. लहानात लहान होऊन रमाल. - वृषभ:-
स्वत:चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. अधिकारांचे मार्गदर्शन मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. व्यवहारी बुद्धिमत्ता वापराल. लेखकांच्या लिखाणाला गती येईल. - मिथुन:-
मनातील इच्छा पूर्ण होईल. हातातील कामात यश येईल. दैनंदिन कमाई चांगली होईल. मोठ्या लोकांच्या ओळखी वाढतील. मुलांसाठी नवीन वस्तु खरेदी कराल. - कर्क:-
कलेतून चांगले मानधन मिळेल. आपली पत सांभाळण्याचा प्रयत्न कराल. वडीलधार्यांचे मत विरोधी वाटू शकते. मानसिक ताणतणाव दूर करावा. बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत. - सिंह:-
कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. प्रिय व्यक्तीशी मतभेद संभवतात. मुलांच्या वागण्याचा गांभीर्याने विचार करावा. गुरुकृपेचा लाभ होईल. चांगली संगत लाभेल. - कन्या:-
वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे. भावंडांशी मतभेद संभवतात. चार-चौघांत विरोधी मत मांडू नका. जोडीदाराचा काहीसा दबाव राहील. कौटुंबिक कामांतून धनप्राप्ती होईल. - तूळ:-
कौटुंबिक ताणतणाव जाणवेल. हातापायास किरकोळ इजा संभवते. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव राहील. मुलांच्या चिंता लागून राहतील. - वृश्चिक:-
स्वत: चेच मत खरे कराल. आवश्यकता नसताना सुद्धा खर्च होईल. घरात नातेवाईकांचा गोतावळा जमा होईल. कर्तबगारीला चांगला वाव आहे. जोडीदाराशी मतभेद संभवतात. - धनू:-
नातेवाईकांच्या समस्या सोडवाल. स्वत:मध्ये काही बदल कराल. प्रवासात काही त्रास होण्याची शक्यता आहे. अडथळ्यातून मार्ग काढावा. उगाच चीड-चीड करू नये. - मकर:-
मनातील आकांक्षा पूर्ण होईल. त्रासातून मार्ग निघेल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक केले जाईल. धाडसाने कामे हाती घ्याल. आरोग्यात सुधारणा संभवते. - कुंभ:-
कौटुंबिक जबाबदारी वाढेल. नवीन मित्र जोडावेत. हस्तकलेसाठी वेळ काढावा. सामुदायिक भांडणापासून दूर राहावे. मानापमानाच्या प्रसंगाकडे दुर्लक्ष करावे. - मीन:-
कामाचा आवाका लक्षात घ्यावा. अतिश्रमामुळे थकवा जाणवेल. जोडीदाराचा छानसा सहवास लाभेल. कौटुंबिक सौख्यास प्राधान्य द्याल. लपवाछपवीचे व्यवहार करू नका.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 16th Mar 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, १६ मार्च २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 16-03-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 16th march 2020 aau