- मेष:-
कौटुंबिक सौख्य जपावे. उगाचच चीड-चीड करू नका. क्षुल्लक गोष्टी मनावर घेऊ नयेत. गुरु कृपेचा लाभ होईल. शैक्षणिक प्रश्न मार्गी लागतील. - वृषभ:-
जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. पोटाचे त्रास संभवतात. जवळच्या प्रवासात सावधानता बाळगा. कला जोपासायला वेळ द्यावा. वडीलधार्यांचा विरोध होऊ शकतो. - मिथुन:-
खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराची प्रगल्भता लक्षात येईल. हातातील कामात यश येईल. उष्णतेचा त्रास संभवतो. - कर्क:-
मुलांशी मतभेद संभवतात. वात-विकाराचा त्रास जाणवेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. एकमेकांचे मत समजून घ्यावे. कामानिमित्त प्रवास घडेल. - सिंह:-
घरातील शांतता जपावी. कर्जप्रकरणे पुढे ढकला. तूर्तास जमिनीची कामे करू नयेत. मुलांची प्रगती दिसून येईल. कामाच्या ठिकाणी समाधान लाभेल. - कन्या:-
जवळचे मित्र भेटतील. लहान प्रवास घडेल. कामाला अधिक हुरूप येईल. उपासनेला अधिक बळ मिळेल. बौद्धिक दिमाख दाखवाल. - तूळ:-
वाहन चालवताना काळजी घ्यावी. तिखट पदार्थ खाण्याची हौस भागवाल. आवडी-निवडी बाबत जागरूक राहाल. बोलतांना सावधगिरी बाळगा. कौटुंबिक खर्च वाढेल. - वृश्चिक:-
रागाचा पारा चढू देवू नका. आततायीपणा करू नये. इतरांची मदत घेण्यास हरकत नाही. योग्य तारतम्यता बाळगावी. घरात मानाने राहाल. - धनू:-
मानसिक चंचलता जाणवेल. घरातील जबाबदारी उचलाल. गोड बोलून कार्यभाग साधावा. खर्चाचे प्रमाण लक्षात घ्यावे. घशाचा त्रास संभवतो. - मकर:-
स्वत:चे स्वत्व राखून वागाल. वागण्यातून आत्मविश्वास दर्शवाल. जुन्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे. कणखरपणा ठेवावा. मित्रांशी वाद संभवतात. - कुंभ:-
इतरांना मदत करण्यात आनंद मानाल. सर्वांशी हसून-खेळून वागाल. छंदाला अधिक वेळ द्याल. प्रतिकूलतेतून मार्ग काढाल. व्यावसायिक बदल कराल. - मीन:-
वरिष्ठ नाराज होण्याची शक्यता आहे. काही गोष्टी लपविण्याकडे कल राहील. मनातील इच्छा पूर्ण होतील. सामाजिक बाबीत पुढाकार घ्याल. मुलांची प्रगती दिसून येईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 20th Jan 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, २० जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 20-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 20 january 2020 aau