- मेष:-
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. जोडीदाराबरोबर वाद घालू नका. मतभेदापासून दूर राहावे. भगीदाराची बाजू समजून घ्यावी. स्वभावविरोधाला सामोरे जावे लागेल. - वृषभ:-
उष्णतेचे त्रास जाणवतील. कामाच्या ठिकाणी अधिकार गाजवाल. केलेल्या कामातून समाधान मिळेल. चहाडखोर व्यक्तींपासून दूर राहावे. अकारण चिडचिड होऊ शकते. - मिथुन:-
कौटुंबिक समस्यांकडे लक्ष द्यावे. मुलांच्या स्वतंत्र गोष्टींचा बाऊ करू नका. कौटुंबिक स्वास्थ जपावे. चपळाईने कामे कराल. कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. - कर्क:-
घरगुती प्रश्न सामोरे येतील. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे लागेल. जमिनीची कामे पार पडतील. सतत कार्यरत राहाल. श्रम वाढतील. - सिंह:-
न डगमगता कामे हाती घ्याल. वैचारिक मतभेद टाळावेत. आपल्याच मतावर आग्रही राहाल. परिस्थिती समजून वागाल. इतरांची बाजू प्रांजळपणे समजून घ्याल. - कन्या:-
दिवस खटपट करण्यात जाईल. कष्टाला घाबरून जाऊ नका. मनात येईल त्याप्रमाणे खरेदी कराल. जरुरी नसतांना उदारपणे वागाल. बोलतांना सावधगिरी बाळगा. - तूळ:-
इतरांवर तुमचा रुबाब पडेल. आपलेच मत खरे कराल. कामाचा हुरूप वाढेल. अडथळ्यातून मार्ग काढता येईल. उतावीळपणे वागू नका. - वृश्चिक:-
दूरच्या प्रवासाचा योग येईल. सामुदायिक बाबीत लक्ष घालू नका. पोटाची काळजी घ्यावी. समयसुचकता बाळगावी लागेल. मानसिक त्रास संभवतो. - धनु:-
योग्य संधीची वाट पाहावी लागेल. मुलांच्या वागण्याकडे लक्ष द्यावे. अधिक श्रम घ्यावे लागतील. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. खटपट करून काम मिळवाल. - मकर:-
अनपेक्षित बदल घडून येतील. बदलीची शक्यता आहे. एककल्ली विचार करू नका. कामे जलद गतीने करण्यावर भर द्याल. स्थावरची कामे उरकली जातील. - कुंभ:-
प्रवासात सतर्कता दाखवावी. कामाची तांत्रिक बाजू जाणून घ्यावी. सासुरवाडीच्या मंडळींशी सलोखा ठेवावा. स्वकष्टावर अधिक लक्ष द्यावे. उपासनेला अधिक बळ मिळेल. - मीन:-
स्त्रियांना आरोग्याची काळजी घ्यावी. किरकोळ जखमांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. नसत्या वादात अडकू नका. गैरसमजापासून दूर राहा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, सोमवार, २३ डिसेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 23-12-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi monday 23 december 2019 aau