- मेष:-
मानसिक चांचल्य जाणवेल. गुरुकृपेचा लाभ घ्यावा. फार काळजी करण्याचे कारण नाही. झोपेची तक्रार कमी होईल. सामाजिक जाणिवेपोटी काही कामे कराल. - वृषभ:-
मित्रमंडळ जमवाल. जवळच्या लोकांचा सहवास लाभेल. स्वकष्टाने इच्छा पूर्ण कराल. नवीन ओळखी होतील. आर्थिक लाभाचा फायदा घ्यावा. - मिथुन:-
कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. बँकांचे कामे सुरळीत पार पडेल. वडिलांची उत्तम साथ मिळेल. आर्थिक चणचण मिटेल. बढतीची चिन्हे दिसतील. - कर्क:-
दूरच्या प्रवासाचा योग येईल. सर्वांशी नम्रतेने वागाल. वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद मिळेल. तीर्थाटनाचा विचार कराल. उपासनेत प्रगती करता येईल. - सिंह:-
मनाची स्थिरता जपावी. अचानक धनलाभाची शक्यता. शेयर्स मधून फायदा संभवतो. आरोग्याची काळजी घ्यावी. खर्चावर नियंत्रण ठेवावे. - कन्या:-
आर्थिक प्रश्न मिटतील. स्वकष्टाचा आनंद घ्याल. कामाचा व्याप वाढेल. पुरेशी झोप घ्यावी. पित्त विकार बळावू शकतो. - तूळ:-
संभाषणाची आवड जोपासली जाईल. कलेतून आर्थिक फायदा होईल. सामाजिक वादात अडकू नये. अडकलेली कामे प्रथम मार्गी लावावीत. अंगीभूत कलेला वाव द्यावा. - वृश्चिक:-
पैज जिंकता येईल. रेस, सट्टा यातून फायदा संभवतो. कारमणुकीवर अधिक वेळ खर्च कराल. मित्रांचा फड जमवाल. आवडते पुस्तक वाचाल. - धनु:-
घरगुती कामात वेळ जाईल. घरातील वातावरण आनंदी असेल. पारमार्थिक क्षेत्रातील व्यक्तीचा सल्ला घ्याल. स्वतः साठी वेगळा वेळ काढावा. ज्येष्ठांचा आदर कराल. - मकर:-
जवळचा प्रवास करावा लागेल. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. काही गोष्टींचे चिंतन करावे. स्वभावात लहरीपणा जाणवेल. सामाजिक वजनावर लक्ष द्याल. - कुंभ:-
कौटुंबिक सौख्यात रमाल. आवडी-निवडी बाबत सतर्कता दाखवाल. कामाचा योग्य मोबदला मिळेल. आवाजात गोडवा ठेवाल. कौटुंबिक विचार आधी कराल. - मीन:-
तुमच्यातील प्रेमळपणा दिसून येईल. जोडीदाराचे उत्पन्न वाढेल. तीव्र मतभेद दर्शवू नका. समजूतदारपणाची जाणीव जागृत ठेवावी. दिवस प्रसन्नतेचा जाईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 12th Oct 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शनिवार, १२ ऑक्टोबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 12-10-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 12 october 2019 aau