- मेष:-
कलात्मक गोष्टींची ओढ वाढेल. बौद्धिक चर्चा कराल. जुन्या आठवणींनी मनाला समाधान मिळेल. खर्चासाठी हात आवरता घ्यावा. जोडीदाराचा उत्तम पाठिंबा मिळेल. - वृषभ:-
बोलण्यातून समोरच्यांची मने जिंकाल. हातातील कामात खंड पडू देऊ नका. घरातील कामांची जबाबदारी वाढेल. मनात उगाच शंका आणू नका. आरोग्याबाबत हलगर्जीपणा करू नका. - मिथुन:-
आपल्या निर्णयावर ठाम राहावे. लोकांशी वैयक्तिक संपर्क टाळावा. आवडीच्या गोष्टी करण्यात अधिक रमून जाल. अनावश्यक गोष्टींसाठी खर्च होऊ शकतो. वरिष्ठांना खुश ठेवावे लागेल. - कर्क:-
सर्वांशी आपुलकीने वागा. बाहेरील लोकांना भेटणे टाळा. जबाबदारीची जाणीव जागृत ठेवा. प्रिय व्यक्तीची भेट होईल. हौसेवर पैसे खर्च कराल. - सिंह:-
मित्रांशी गप्पा रंगतील. स्वप्नातून बाहेर येऊन कामाला लागा. मनातील खिन्नता काढून टाकावी. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. तुमच्या कामाची शाबासकी मिळेल. - कन्या:-
घरातील वातावरण आनंद देऊन जाईल. वरिष्ठांशी शांतपणे वागा. गृहोपयोगी वस्तु खरेदी कराल. विनाकारण कुणाच्या मदतीला धावू नका. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्या. - तूळ:-
उत्तम वाचनाचा आनंद घ्याल. तिखट पदार्थ टाळा. भावंडांसाठी पैसा खर्च होईल. एखादी नवीन योजना सुचेल. शांत राहून मानसिक स्वास्थ्य अनुभवा. - वृश्चिक:-
मुलांवरील खर्च वाढेल. आपल्या बोलण्यातून कोणी दुखवणार नाही याची दक्षता घ्या. अधिकार जपून वापरा. वादाचे प्रसंग टाळावेत. संपर्कातील लोकांशी फटकून वागू नका. - धनू:-
समोरच्याचे शांतपणे ऐकून घ्यावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. आर्थिक बाबतीत उत्तम दिवस. आहारावर नियंत्रण हवे. उत्साहाच्या भरात अनाठायी खर्च वाढू शकतो. - मकर:-
छंद जोपासण्यासाठी वेळ काढावा. इतरांच्या कामात दिवस घालवाल. जुनी कामे व्यवस्थित पार पडतील. उदात्त दृष्टीकोन ठेवाल. दुसर्यांच्या मदतीला धावून जाल. - कुंभ:-
निरूत्साह झटकून कामाला लागा. घरातील कामे मार्गी लावा. जुन्या गोष्टींबाबत मनात संभ्रम बाळगू नका. धाडस दाखवताना सारासार विचार करावा. समस्यांचे निराकरण करता येईल. - मीन:-
स्वप्न पूर्ण करण्याची ताकद बाळगा. अचानक येणार्या खर्चावर नियंत्रण ठेवा. अति तिखट पदार्थ कमी खा. महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. मुलांना वेळ द्यावा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 29th Aug 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ ऑगस्ट २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 29-08-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi saturday 29th august 2020 aau