- मेष:-
गेले काही दिवस झालेली चिडचिड कमी होईल. मनोरंजनात्मक वाचन होईल. आजचा दिवस चांगला जाईल. नवीन ओळखी लाभदायक ठरतील. तुमच्यातील उत्साह वाढेल. - वृषभ:-
मित्र व नातेवाईक कौतुक करतील. कामे सुरळीत पार पडतील. हस्तकलेला वाव मिळेल. सामाजिक जाणीव जागृत ठेवाल. सरकारी नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी राखावी. - मिथुन:-
जिव्हाळ्याची व्यक्ति भेटेल. अनावश्यक खर्च कराल. दिवसाचा पूर्वार्ध चांगला जाईल. नोकरदारांना दिलासा मिळेल. अधिकाराचा योग्य वापर करता येईल. - कर्क:-
अतिघाई करू नये. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. स्वविचारात मग्न राहाल. जवळच्या व्यक्तींशी संपर्कातून चांगला मार्ग निघेल. हौस भागवण्यावर खर्च कराल. - सिंह:-
कामाचा ताण जाणवेल. योग्य गुंतवणुकीला वाव आहे. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. संपर्कातील लोकांशी चांगला संवाद साधला जाईल. सकारात्मकता अंगी बाणवा. - कन्या:-
दिवस उत्तम जाईल. घरातील अडकलेली कामे मार्गी लागतील. झोपेची किरकोळ तक्रार जाणवेल. दिवसाचा पूर्वार्ध अनुकूल राहील. बोलण्यावर संयम ठेवा. - तूळ:-
करमणूक प्रधान दिवस. मनातील इच्छा पूर्ण होईल. अधिकाराची महत्त्वाकांक्षा वाढीस लागेल. कौटुंबिक गोष्टी समजूतदारपणे हाताळा. लबाड लोकांपासून दूर राहावे. - वृश्चिक:-
घरगुती कामे करण्यात वेळ जाईल. नवीन विचारांना चालना मिळेल. मित्रांची योग्य वेळी मदत मिळेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. मोठ्या मनाने गोष्टींकडे पहाल. - धनू:-
रखडलेल्या कामात मदत मिळेल. अर्थाचा अनर्थ करू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. व्यावसायिक येणी मिळतील. नवीन ओळखी होण्याची शक्यता. - मकर:-
बोलण्यातून गैरसमज टाळा. घरासाठी थोडी जास्त खरेदी होईल. भावंडांशी संवाद साधावा. कौटुंबिक वातावरण सकारात्मक राहील. आपले काम भले व आपण भले असे राहावे. - कुंभ:-
दिवस इच्छेप्रमाणे घालवाल. बोलण्यावर संयम ठेवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. कार्यक्षेत्रात जबाबदार्या वाढतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. - मीन:-
घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्या. एखाद्या स्पर्धेत यश मिळेल. मन विचलीत होऊ शकते. उगाच त्रागा करू नका. प्रेमात संयम बाळगावा.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 3rd Sep 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, गुरुवार, ०३ सप्टेंबर २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन
Updated:

First published on: 03-09-2020 at 00:30 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 03rd september 2020 aau