- मेष:-
स्थावरची कामे मार्गी लागतील. हातून एखादे सत्कार्य घडेल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. चांगली मन:शांती लाभेल. तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. - वृषभ:-
प्रवासात सर्वतोपरी काळजी घ्यावी. काहीशी कौटुंबिक चिंता सतावेल. काटकसरीने वागावे लागेल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. मतभिन्नता दर्शवू नका. - मिथुन:-
मुलांकडून आनंद वार्ता मिळतील जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. बाहेरील अन्नपदार्थ टाळा. तुमचे संपर्क क्षेत्र वाढेल. चांगले वाहन सौख्य लाभेल. - कर्क:-
नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. मनातील अकारण भीती बाजूला सारावी. नामस्मरणाचा लाभ घ्यावा. कौटुंबिक खर्च वाढेल. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका. - सिंह:-
वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल. तुमच्या ज्ञानात भर पडेल. हातातील कामे तडीस जातील. कुटुंबात मंगल कार्य होईल. ओळखीचा फायदा घ्यावा. - कन्या:-
अतिअपेक्षा बाळगू नका. खर्चाचे योग्य नियोजन करावे. समाधान बाळगणे गरजेचे आहे. मानसिक शांतता जपावी. जोडीदाराची बाजू लक्षात घ्या. - तुळ:-
प्रवासात योग्य खबरदारी घ्यावी. नातेवाईकांमधील दुरावा दूर करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिक चिंता लवकरच मिटेल. हातातील कामांत कसूर करू नका. अनाठायी खर्च टाळावा. - वृश्चिक:-
हातात नवीन अधिकार येतील. भान राखून वागावे. वरिष्ठांची मर्जी राहील. धाडसाने कामे हाती घ्यावी. कामे अधिक उर्जेने कराल. - धनू:-
कौटुंबिक काळजी करू नका. जबाबदारीची जाणीव ठेवा. अतिविचारात वेळ व्यर्थ जाईल. सामुदायिक वादापासून दूर राहावे. दूरच्या प्रवासात काळजी घ्यावी. - मकर:-
गरज लक्षात घेऊन खर्च करा. मैत्रीत गैरसमज टाळावेत. स्थावरच्या कामांतून फायदा संभवतो. अचानक धन लाभाची शक्यता. कौटुंबिक सौख्याचा विचार कराल. - कुंभ:-
बढतीसाठी प्रयत्न करावेत. कामातून चांगली आर्थिक प्राप्ती होईल. झोपेचे तक्रार जाणवेल. कामाच्या ठिकाणी मान वाढेल. फसवणुकीपासून सावध रहा. - मीन:-
अपवादाकडे लक्ष देऊ नका. व्यावसायिक लाभाकडे लक्ष केन्द्रित करा. हितशत्रूंपासून सावध रहा. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. कौटुंबिक शांतता जपावी.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, गुरुवार, २३ जानेवारी २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 23-01-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi thursday 23 january 2020 aau