मेष

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दत्त महाराजांची उपासना करावी. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –निळा

वृषभ

गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. अधिकार संपन्नता येईल. शेती, बांधकाम व्यावसायिक, कमोडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जाईल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग –हिरवा

मिथुन

गणपती मंदिरामध्ये गुळ, खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

कर्क

ॐ गँ गणपते नमः या मंत्राचा जप करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे प्रवास टाळावेत. उष्णता आणि वातविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग –पिवळा

सिंह

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -निळा

कन्या

गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करीत असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –गुलाबी

तुळ

गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू अर्पण करावे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -निळा

वृश्चिक

दत्त महाराज आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करावी. भागीदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करीत असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –पांढरा

धनु

ॐ श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग –निळा

मकर

गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती, स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग –तपकिरी

कुंभ

गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होईल.
आजचा रंग-पांढरा

मीन

ॐ श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करीत असताना विचार्रविनिमय करून निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi tuesday 05 june
First published on: 05-06-2018 at 01:38 IST