Surya Transit 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्यदेव महिन्यानंतर राशी बदल करतात. यानुसार सूर्यदेव जूनमध्ये मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिषशास्त्रानुसार बुध आणि सूर्यदेव यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अशा परिस्थितीत सूर्यदेवाच्या संक्रमणामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींच्या लोकांच्या संपत्ती, मान, प्रतिष्ठेत वाढ होऊ शकते. चला जाणून घेऊया या भाग्यशाली राशींविषयी…

मिथुन

सूर्यदेवाचा राशी बदल मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमच्यातील आत्मविश्वास वाढू शकतो. समाजात मानप्रतिष्ठा मिळू शकते. करिअरमध्ये चांगली कामगिरी करू शकाल आणि अनेक चांगल्या मोठ्या संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. तुमच्या कुटुंबात सुख-समृद्धी नांदू शकते. तसेच, विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनातही आनंदाचे क्षण येऊ शकतात.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya gochar surya transit 2024 sun transit in mithun these 3 zodiac sign will be lucky will get rich soon sjr
First published on: 30-04-2024 at 17:57 IST