मेष
दत्त महाराजांची उपासना करणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – लाल

वृषभ
दत्त महाराजांची उपासना करणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – आकाशी

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
9th April 2024 Panchang & Marathi Horoscope
गुढीपाडवा विशेष राशी भविष्य: ९ एप्रिलला मेष ते मीनपैकी कुणाचं नशीब घेईल कलाटणी; तुमचं नववर्ष होणार गोड?
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

मिथुन
गणपती व दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकावर मात करू शकाल.
आजचा रंग – नारंगी

कर्क
गणपती मंदिरामध्ये गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

सिंह
ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – सोनेरी

कन्या
कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – पांढरा

तुळ
गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करु शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – सोनेरी

वृश्चिक
गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तू अर्पण कराव्यात. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला-मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – निळा

धनु
दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – पांढरा

मकर
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – लाल

कुंभ
गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग- आकाशी

मीन
ओम श्री आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करणे. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला-मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu