मेष:- कामात मन रमवावे. जवळचे नातेवाईक भेटतील. जोडीदाराशी मतभेद संभवतात. चारचौघात जपून बोलावे. भागीदाराशी समजुतीने वागावे. वृषभ:- प्रवासाचा आनंद घ्याल. हातातील कलेचा सदुपयोग करावा. भावंडांचा प्रेमळ सहवास लाभेल. आवडते ग्रंथ वाचायला मिळतील. सर्वांशी प्रेमळ संवाद साधाल. मिथुन:- शेअर्समध्ये गुंतवणूक कराल. कौटुंबिक खर्चाचे गणित मांडाल. हसत-खेळत कामे कराल. आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घ्याल. प्रेमळपणे सर्वांचे मन जिंकून घ्याल. कर्क:- कौटुंबिक विसंवाद दूर करावेत. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. मनाची चंचलता जाणवेल. जोडीदाराची मनधरणी करावी. प्रेम संबंध जपावेत. सिंह:- मैत्रीतील दुरावा दूर करावा. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल. वादात फार लक्ष घालू नये. दुचाकी वाहन चालवितांना काळजी घ्यावी. चुकीचे विचार बाजूला सारावेत. कन्या:- आरोग्यात सुधारणा होईल. मोठ्यांचे आशीर्वाद मिळतील. तुमच्यातील धाडस वाढेल. कामाच्या ठिकाणी कौतुकास पात्र व्हाल. मोठ्याने बोलणे टाळावे. तूळ:- चुकीच्या संगतीत अडकू नका. अनाठायी खर्च वाढेल. योग्य तारतम्यता बाळगावी. अघळपघळ बोलू नका. कौटुंबिक खर्चावर लक्ष ठेवा. वृश्चिक:- कामाचा व्याप वाढेल. जोडीदाराचे मत जाणून घ्यावे. सामाजिक जाणिव जागृत ठेवावी. कागदपत्रे जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. धनु:- घरातील कार्यक्रमात सहभागी नोंदवाल. क्षणिक गोष्टींनी नाराज होऊ नका. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवावे. नवीन मित्र मिळतील. जमिनीच्या कामात लाभ संभवतो. मकर:- काही कामे जास्त श्रम करायला लावतील. बदलांना सकारात्मकतेने पहा. कमिशनच्या कामात लाभ संभवतो. आर्थिक चिंता मिटेल. मुलांच्या आनंदात रमून जाल. कुंभ:- प्रवासात सतर्कता बाळगावी. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. मनातील इच्छा पूर्ण होतील. कलेला प्रसिद्धी मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. मीन:- लहानांच्या आनंदात सहभागी व्हाल. औषधोपचार वेळेवर घ्यावेत. पित्तामुळे चिडचिड वाढेल. करमणुकीचे खेळ खेळाल. रेस, जुगार यांमध्ये फायदा संभवतो. – ज्योतिषी विद्याधर करंदीकर