मेष

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. आज दिवसभर अथर्वशीर्ष ऐकावे किंवा पाठ करावेत.
आजचा रंग – निळा

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडाच्या गाठीभेटीचे योग. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महादेवाचे स्मरण करुन ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे.
आजचा रंग – आकाशी

25th April Panchang Marathi Rashi Bhavishya Thursday 48 Minutes Abhijaat Muhurta
२५ एप्रिल पंचांग: गुरुवारी ‘ही’ ४८ मिनिटे आहे अभिजात मुहूर्त; मेष ते मीन राशीला लक्ष्मी नारायण कसे देतील आशीर्वाद?
21st April Panchang Daily Marathi Horoscope Sarvarth Siddhi Yog
२१ एप्रिल पंचांग: आजचा सर्वार्थ सिद्धी योग १२ पैकी ‘या’ राशींना देईल मान व धन; रविवारी कुणाचं नशीब चमकणार?
10th April 2024 Panchang Mesh To Meen Rashi Bhavishya Today
१० एप्रिल पंचांग: तूळ, कर्कसहित ‘या’ राशी आज धनाढ्य होऊन इतरांनाही करतील मदत; आजचे १२ राशींचे भविष्य वाचा
7th April Panchang Masik Shivratri Mesh To Meen Daily Horoscope
७ एप्रिल पंचांग: एप्रिलची शिवरात्री मेष ते मीन राशींपैकी कुणाला देईल भोलेनाथांची कृपा; तुमच्या कुंडलीत काय लिहिलंय?

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय शकाल. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्तोत्राचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण असेल. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पिवळा

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी सलोख्याने वागावे. ओम श्री क्लीम नमः जप करणे.
आजचा रंग – निळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. महादेवाच्या मंदिरात एक मूठ तांदूळ अर्पण करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे आणि ओटी भरणे.
आजचा रंग – मरुन

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. धाडसी निर्णयाचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. आर्थिक स्थिती चांगली राहील. आज गणेश स्तुती म्हणणे.
आजचा रंग – पोपटी

धनु

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. आनंदी ग्रहमान कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घेऊ शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. गणपती मंदिरात गुलाबाचे फुल अर्पण करणे.
आजचा रंग – हिरवा

मकर

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. कर्ज प्रकरणाचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – राखाडी

मीन

आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना सुरू ठेवण्यासाठी त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करणे.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu