27 April 2024 Panchang & Rashi Bhavishya: आज २७ एप्रिलला चैत्र मासातील कृष्ण पक्षातील तृतीया व चतुर्थी तिथी असणार आहे. सकाळी ८ वाजून १८ मिनिटांनी तृतीया तिथी समाप्त होणार असून तेव्हापासून दिवसभर संकष्टी चतुर्थी असणार आहे. चतुर्थी तिथी रात्री ३ वाजून २३ मिनिटांपर्यंत असणार आहे. आजच्या दिवशी पहाटे ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत ज्येष्ठा नक्षत्र जागृत असणार आहे व त्यात परीघ योग जुळून येणार आहे. संकष्टी चतुर्थी व शनिवारच्या योगायोगाने आज कोणत्या राशीचे भाग्य उजळणार आहे, हे पाहूया..

शनिवार, २७ एप्रिल २०२४, पंचांग व राशी भविष्य

मेष:-गप्पांमध्ये रंगून जाल. व्यावसायिक अधिकार प्राप्त होतील. आर्थिक परिस्थिती सुधारली जाईल. काही गोष्टींचा धूर्तपणे विचार करावा. चौकसपणे गोष्टी जाणून घ्याल.

11th June Daily Rashi Bhavishya Marathi Horoscope
११ जून दैनिक राशी भविष्य: मेष, वृश्चिकसह आज पंचांगानुसार ‘या’ मंडळींच्या कुंडलीत प्रचंड लाभ; १२ राशींना कसा जाईल मंगळवार?
10th June Panchang & Rashi Bhavishya
१० जून पंचांग: आज विनायक चतुर्थीला ‘पुष्य नक्षत्र’ चमकवणार ‘या’ राशींचे नशीब; बाप्पा कुणाला देणार लाडू पेढेरुपी आशीर्वाद?
29th May Panchang & Marathi Horoscope
२९ मे पंचांग: श्रावण नक्षत्रात मेष ते मीन राशींवर बरसणार सुखाच्या सरी; इंद्र योगासह तुमच्या राशीत कोणते बदल आज घडणार, पाहा
26th May Ekadant Sankashti Chaturthi 55 Minutes Abhjiaat Muhurta Mesh To Meen Rashi Bhavishya
एकदंत चतुर्थी, २६ मे पंचांग: संकष्टीला दुपारी ५५ मिनिटांचा अभिजात मुहूर्त; मेष ते मीनपैकी कुणाचा दिवस असेल मोदकासारखा गोड?
three zodic signs will shine with Nakshatra transformation
सूर्य देणार बक्कळ पैसा! नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या लोकांचे चमकणार भाग्य
25th May Panchang Marathi Rashi Bhavishya Mesh To Meen Daily Horoscope
२५ मे पंचांग, शनिवार: ज्येष्ठा नक्षत्र व सिद्ध- साध्य योगाचा प्रभाव तुमच्या राशीत आज काय बदलणार? १२ राशींचे भविष्य वाचा
24th May Panchang & Marathi Horoscope
२४ मे पंचांग: अचानक धनलाभ व साहसी निर्णय, मेष ते मीन राशीत शिव व सिद्ध योगामुळे आज मोठे बदल; वाचा शुक्रवारचं भविष्य
Shani To Open Locker Of Money On Buddha Pornima on 23rd May
शनी खजिन्याचं कुलूप बुद्ध पौर्णिमेला उघडणार; ‘या’ ४ राशींना मिळणार मोठा वाटा, श्रीमंतीसह ‘हे’ लाभ करतील भरभराट

वृषभ:-आध्यात्मिक बळ वाढेल. केलेल्या कामाचे कौतुक केले जाईल. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. कामातून मनाजोगा आनंद मिळेल. वैचारिक दृष्टीकोन बदलला जाईल.

मिथुन:-जोडीदाराचा सुस्वभावीपणा दिसून येईल. काही गोष्टींचा शांतपणे विचार करावा. काटकसरीने वागाल. मुलांशी खेळण्यात वेळ घालवाल. चांगली संगत लाभेल.

कर्क:-उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. घरगुती वापराच्या वस्तु खरेदी केल्या जातील. मनातील इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक कामात रमून जाल. किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह:-भावंडांचे उत्तम सौख्य लाभेल. काही गोष्टीत तडजोडीला पर्याय नाही. भागीदाराशी मतभेद संभवतात. सहकारी वर्गाकडून कौतुक केले जाईल. आवडते पुस्तक वाचायला मिळेल.

कन्या:-घरातील कामे आनंदाने कराल. बाहेरील अन्नपदार्थ खाणे टाळावे. पोटाचे किरकोळ आजार संभवतात. जोडीदाराविषयी मतभेद वाढवू नका. स्मरण शक्तीला ताण द्यावा लागेल.

तूळ:-आपलेच म्हणणे खरे कराल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे व्यतीत कराल. जोडीदाराचे तुमच्यावर प्रभुत्व राहील. सहकुटुंब सहलीचा बेत आखाल. मुलांचे वागणे विरोधी वाटू शकते.

वृश्चिक:-कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यावे. कटुता टाळण्याचा प्रयत्न करावा. दिवसभर कार्यरत राहाल. मानसिक चंचलता जाणवेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

धनू:-भावंडांशी मतभेद संभवतात. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे. व्यापारी वर्ग खुश राहील. स्वभावातील हट्टीपणा कमी करावा. वादविवादात भाग घेऊ नका.

मकर:-उतावीळपणे कामे करणे टाळावे. खर्च करताना मागचा पुढचा विचार करावा. अती श्रमामुळे थकवा जाणवेल. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. शांत व संयमी विचार करावा.

कुंभ:-वैयक्तिक स्वातंत्र्य जपावे. नवीन मित्र जोडावेत. उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न कराल. इतरांच्या आनंदात आनंद मानाल. चांगले वाहन सौख्य लाभेल.

हे ही वाचा<< २०२५ आधी प्रगतीचं शिखर गाठतील ‘या’ राशी’; शनीच्या कृपादृष्टीने जगतील राजेशाही जीवन, धनलाभही होईल बक्कळ

मीन:-स्त्री वर्गापासून जपून राहावे. कामाची व्याप्ती वाढेल. ओळखीतून कामे मार्गी लागतील. मनातील आकांक्षा पूर्ण होतील. अचानक धनलाभ संभवतो.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर