- मेष:-
प्रवासात आरोग्याची काळजी घ्यावी. वरिष्ठांची नाराजी पत्करू नका. हातून एखादे सत्कार्य घडेल. मानभंगाला सामोरे जावे लागेल. प्रतिकूलतेतून मार्ग निघेल. - वृषभ:-
मनाने कामे मिळवाल. सामाजिक कामात पुढाकार घ्याल. अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी चालढकल महागात पडेल. छुप्या शत्रूंकडे लक्ष ठेवावे. - मिथुन:-
सतत आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न कराल. सरकारी नोकरदारांना दिवस चांगला जाईल. पत्नीचा हट्ट पुरवाल. दुचाकी वाहन सावधगिरीने चालवावे. कौटुंबिक परिस्थिती समंजसपणे हाताळावी. - कर्क:-
नातेवाईकांशी मतभेद संभवतात. कौटुंबिक परिस्थितीतून मार्ग काढावा. आरोग्याची काळजी घ्यावी. स्वभावातील मानीपणा दाखवाल. स्वत:चे स्थान टिकवण्याचा प्रयत्न कराल. - सिंह:-
मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. मानसिक ताण राहील. रागाचा पारा चढू देवू नका. चोरांपासून सावध राहावे. ओळखीचा फायदा होईल. - कन्या:-
अतिअपेक्षा ठेवू नका. कौटुंबिक क्लेश टाळण्याचा प्रयत्न करावा. समाधान शोधण्याचा कसोशीने प्रयत्न कराल. जोडीदाराचा निश्चय मान्य करावा लागेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. - तूळ:-
जवळच्या प्रवासात त्रास संभवतो. क्षुल्लक गोष्टीने खचून जाऊ नका. कामाचा उरक वाढेल. हातातील अधिकार वापरावेत. मनोभंगाला सामोरे जावे लागू शकते. - वृश्चिक:-
हातातील कामात यश येईल. हितशत्रूंचा त्रास वाढू शकतो. बौद्धिक दिमाख दाखवाल. उपासनेला चांगले बळ मिळेल. कौटुंबिक वादविवाद सामोपचाराने हाताळा. - धनू:-
प्रवासात रुखरुख लागून राहील. मन:शांति जपण्याचा प्रयत्न करावा. गृहसौख्याला अधिक प्राधान्य द्यावे. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. नातेवाईकांचा विरोध होवू शकतो. - मकर:-
वायफळ खर्च वाढेल. इच्छा नसताना प्रवास करावा लागेल. कोणाच्याही मदतीशिवाय कामे पार पाडाल. योग्य तारतम्य बुद्धी वापरावी. प्रांजळपणे वागणे ठेवाल. - कुंभ:-
उदारपणे वागणे ठेवाल. बोलण्यातून अहंपणा दर्शवू नका. नको तिथे खर्च कराल. बढतीची चिन्हे दिसून येतील. घशाचे विकार होण्याची शक्यता आहे. - मीन:-
स्वत:चा सत्वगुण राखाल. व्यावसायिक लाभाकडे लक्ष द्यावे. अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास बाळगावा लागेल. कष्टाला मागेपुढे पाहू नका.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 18th Mar 2020 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, बुधवार, १८ मार्च २०२०
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 18-03-2020 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 18th march 2020 aau