- मेष:-
जोडीदाराची व्यवहार कुशलता दिसून येईल. भागीदारीत बौद्धिक कुशलता वापरावी. तुमच्या जनसंपर्कात वाढ होईल. तुमच्या सुस्वभावीपणाची चुणूक दिसेल. रेस, जुगार यांतून लाभ संभवतो. - वृषभ:-
जुन्या गोष्टी उकरून काढू नका. इतरांचा विश्वास संपादन करावा. भांडण विकोपाला नेऊ नये. फक्त खऱ्या गोष्टींचा आधार घ्यावा. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा. - मिथुन:-
शैक्षणिक कामात वेळेला महत्व दयावे. बैठे खेळ खेळाल. मित्र-मंडळीत जपून बोलावे. प्रेम संबंध जपावेत. खोटे बोलू नये. - कर्क:-
संभाषणाची आवड पूर्ण कराल. नवीन मित्र जोडाल. घरगुती गोष्टी जपाव्यात. सर्वांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. सर्वसाधारण दिवस चांगला जाईल. - सिंह:-
सर्व गोष्टींचा चौकस विचार कराल. चिंतन-मनन करण्यात वेळ घालवाल. कामात प्रगतीला वाव आहे. लहान प्रवास कराल. योग्य परीक्षण कराल. - कन्या:-
बोलतांना भान राखावे. अनावश्यक खर्च टाळावा. कमिशन मधून फायदा होईल. हसत-हसत काम साधून घ्याल. आर्थिक बाबतीत सावधगिरीने वागावे. - तूळ:-
अभ्यासूवृत्तीने वागाल. तुमच्यातील धुर्तपणा दिसून येईल. हटवादीपणा करू नये. सर्व बाबतीत तत्परता दाखवाल. चलाखीने कामे कराल. - वृश्चिक:-
सामुदायिक भान राखावे. कागदपत्रे जपून ठेवावीत. चुकीच्या कामात हात घालू नये. मित्रांशी वाद घालू नयेत. व्यापारात चांगला लाभ संभवतो. - धनु:-
लहान मुलांशी मैत्र कराल. गप्पीष्ट लोकांच्यात रमून जाल. जमीनकीच्या व्यवहारात सावधानता बाळगावी. लबाड लोकांपासून दूर राहावे. गुरुजनांची भेट घडेल. - मकर:-
हरहुन्नरीपणे आपली कामे करून घ्याल. कमिशनच्या कामातून फायदा होईल. पुढील गोष्टींचा अंदाज बांधाल. व्यावसायिक नफ्यावर लक्ष ठेवाल. कल्पकतेचा योग्य वापर कराल. - कुंभ:-
बौद्धीक ज्ञान वापराल. कडक शिस्तीचे धोरण ठेवाल. वक्तृत्वाची संधी मिळेल. चौकसपणे विचार करावा. प्रवासाची आवड पूर्ण कराल. - मीन-
कफ विकाराचा त्रास जाणवेल. भावंडांचे प्रश्न सामोरे येतील. निश्चित अनुमानावर भर द्यावा. अतिविचार करू नयेत. डोकेदुखीचा त्रास जाणवेल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2019 रोजी प्रकाशित
आजचे राशीभविष्य, बुधवार, २७ नोव्हेंबर २०१९
सर्व बारा राशींचे भविष्य
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 27-11-2019 at 01:00 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 27 november 2019 aau