या वर्षातील पहिले सूर्यग्रहण ३० एप्रिल रोजी होणार आहे. हे सूर्यग्रहण खंडग्रास असेल. पंचांगानुसार ३० एप्रिल या दिवशी वैशाख महिन्यातील अमावस्या येत आहे. शनिवारी येणाऱ्या या अमावस्यामुळे शनि अमावस्येचा योग तयार होत आहे. या दिवशी शनिदेवाची पूजा करणं फलदायी असतं. त्यामुळे हे ग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. सूर्यग्रहण मध्यरात्री १२ वाजून १५ मिनिटांनी सुरू होईल आणि पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत चालेल. सूर्य ग्रहण मेष राशीत होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही किंवा तो सुतक काळ मानला जाणार नाही. ग्रहण दक्षिण अमेरिकेचा नैऋत्य भाग, पॅसिफिक महासागर, अटलांटिक आणि दक्षिण ध्रुवावर दिसणार आहे. या ग्रहणाचा प्रभाव सर्व राशींवर राहील. पण तीन राशींना विशेष फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत तीन राशी…

वृषभ : या राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण खूप शुभ असणार आहे. या ग्रहणामुळे तुमची आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. करिअरमध्ये यश मिळू शकते. तसेच अपूर्ण कामेही करता येतील. नवीन व्यावसायिक संबंध निर्माण होऊ शकतात. यावेळी तुम्ही व्यवसायात नवीन गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीचा तुम्हाला भविष्यात फायदा होऊ शकतो.

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
1st March Panchang Marathi Horoscope Shani krupa On First Saturday On Mesh To meen Who Will Earn More In March 2024 Astrology
१ मार्च पंचांग: लक्ष्मी कृपेने महिन्याचा पहिला शुक्रवार मेष ते मीन राशीला कसा जाईल? लाभ कुणाला, भविष्य सांगते की..
29 February Horoscope Marathi
२९ फेब्रुवारी, गुरुवार पंचांग: चार वर्षांतून एकदा येतो ‘हा’ खास दिवस! कसे असेल बारा राशींचे ग्रहमान, पाहा
Shukra And Rahu Yuti
होळीनंतर ७ दिवसांनी ‘या’ राशींना होणार प्रचंड धनलाभ? राहू-शुक्रदेवाची युती होताच लक्ष्मी कृपेने मिळू शकतो अपार पैसा

कर्क : हे ग्रहण यश देणारे ठरू शकते. या दरम्यान तुम्हाला कामात यश मिळेल. तसेच नशिबाची पूर्ण साथ मिळेल. या काळात तुमची कामाच्या ठिकाणी आणि समाजात चांगली प्रतिमा निर्माण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुमची कार्यशैली सुधारू शकते, ज्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये तुमची प्रशंसा होऊ शकते. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते.

तूळ : सूर्यग्रहण तुमच्या राशीसाठी खूप शुभ असणार आहे. व्यवसायात चांगला फायदा होऊ शकतो. व्यवसायात गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. तसेच, जर तुमचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्ही चांगली कमाई करू शकता. तसेच तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर तुम्हाला पैसे मिळू शकतात.