Chanakya Niti For a Strong Relationship: आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान होते. आजही जर आपण त्यांच्या धोरणांचे पालन केले तर समस्या आर्थिक असो वा जीवनातील प्रगती आणि विवाहाशी संबंधित असो…कोणतीही समस्या त्यांच्या धोरणांद्वारे सोडवली जाऊ शकते. पती-पत्नीचे नाते खूप पवित्र आणि स्पेशल असतं. अनेकवेळा छोट्या-छोट्या गोष्टींमुळे अनेक नाती तुटतात, तर मग आम्ही तुम्हाला चाणक्यानुसार अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्यांचं तुम्ही पालन केलं तर तुमचे वैवाहिक जीवन उत्तम राहू शकतं आणि तुमचं नातं नेहमी मजबूत राहतं.

मर्यादा राखली पाहिजे
पती-पत्नीच्या नात्यात नेहमी सन्मान असावा, असे चाणक्य मानतात. तसंच पती-पत्नीच्या नात्यात मर्यादा असंही आवश्यक असतं. नातं कोणतंही असो त्या नात्याच्या मर्यादा कधी ओलांडू नये. कारण अनेक वेळा पुरुष छोट्या छोट्या गोष्टींपासून नात्याची मर्यादा ओलांडतात, ज्यामुळे कोणत्याही नात्यावर परिणाम होऊ शकतो.

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
व्यक्तिवेध : मीना चंदावरकर
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?
Chaturang article a boy friendship with two female friends transparent and free communication
माझी मैत्रीण : पारदर्शक संवाद!

आणखी वाचा : Chanakya Niti: या लोकांना त्रास देऊ नका, अन्यथा संकटांना सामोरे जावे लागेल

निरुपयोगी गोष्टींवर भांडू नका
आचार्य चाणक्य सांगतात की, पती-पत्नीने अनावश्यक गोष्टींवर भांडू नये. छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण झालं तर कधी कधी याच छोट्या-छोट्या गोष्टींवरून होणारं भांडण पुढे जाऊन मोठं भांडण बनू शकतं. पती -पत्नीने अनावश्यक गोष्टींवरून भांडण करू नयेत. अशाने त्यांचे नाते मजबूत राहते.

एकमेकांबद्दल आदर
पती-पत्नीच्या नात्यामध्ये नेहमी एकमेकांबद्दल आदर असायला हवा, असे चाणक्य मानतात. नाते पती-पत्नीचे असो किंवा इतर कोणाचे असो, नेहमी आदर असला पाहिजे. म्हणूनच आपले वडीलही म्हणतात की जर तुम्हाला मान मिळावा असे वाटत असेल तर तुम्ही आधी समोरच्याचा आदर केला पाहिजे.

आणखी वाचा : Chanakya Niti: ही एक गोष्ट दूर होताच माणूस एकाकी होतो! जवळचे लोकही साथ सोडतात

टीका ऐका
प्रत्येक माणसामध्ये काही ना काही कमतरता असते. म्हणून तुम्हालाही समोरची एखादी गोष्ट पटत नसेल आणि कोणी टीका करत असेल तर ते ऐकून घ्या. तुम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ही गोष्ट पती-पत्नीच्या नात्यातही लागू होते. जर तुमच्या जोडीदाराला तुमची कोणतीही गोष्ट आवडत नसेल तर तुम्ही त्यावर विचार करून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर तुम्ही असे केले तर तुमचे विवाहित आयुष्य खूप चांगले होईल.