श्रीमंत होणे जितके कठीण आहे, तितकेच श्रीमंती टिकून ठेवणे कठीण आहे. कधी कधी एक छोटीशी चूकही श्रीमंत माणसाला काही वेळातच गरीब करू शकते. महान अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीतिमध्ये अशा चुका सांगितल्या आहेत, ज्यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते. म्हणूनच या चुका कधीही करू नयेत.

या चुकांमुळे देवी लक्ष्मी क्रोधित होते
आचार्य चाणक्य म्हणतात की, काही लोकांना त्रास दिल्याने देवी लक्ष्मी क्रोधित होते. श्रीमंत झाल्यानंतर स्वत:ला शक्तिशाली मानून या लोकांचा छळ करणं तुम्हाला खूप जड जाऊ शकतं आणि तुम्हाला आयुष्यभर त्याचा फटका सहन करावा लागू शकतो. अन्यथा तुमचा अहंकार तुम्हाला नष्ट करतो.

ditch that glass of ice cold water during summer
उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…
Gajlaxmi Rajyog
येत्या ७ दिवसांनी ‘या’ राशींचे येणार चांगले दिवस? ‘शुभ योग’ बनल्याने लक्ष्मी कृपेने बँक बँलेन्समध्ये झपाट्याने होऊ शकते वाढ
Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
Insomnia Before Period
महिलांनो, मासिक पाळीदरम्यान चांगली झोप येत नाही? स्त्रीरोगतज्ज्ञांनी सुचविलेल्या ‘या’ ४ गोष्टी करुन पाहा, लागेल शांत झोप

आणखी वाचा : Chanakya Niti: ही एक गोष्ट दूर होताच माणूस एकाकी होतो! जवळचे लोकही साथ सोडतात

आचार्य चाणक्य म्हणतात की, स्वत:ला सामर्थ्यवान समजत स्त्रीवर अत्याचार करण्याची चूक कधीही करू नका. असे केल्याने तुम्ही आयुष्यभर गरीब होऊ शकता. महिलांचा अपमान करणे, त्यांना त्रास देणे यामुळे लक्ष्मी देवी नाराज होते.

गरीब किंवा असहाय व्यक्तीला त्रास दिल्याने तुमची प्रतिष्ठा आणि पैसाही खराब होतो. गरिबांना त्रास देण्याची चूक कधीही करू नका, असे केल्याने तुमच्यावर संकटांचा डोंगर कोसळू शकतो.

आणखी वाचा : Dussehra 2022 : यावर्षी दसरा ४ की ५ ऑक्टोबरला? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मुलांना देवाचे रूप मानले जाते. एखाद्या मुलावर अत्याचार करणे, त्याचा छळ करणे हे तुमच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. निष्पाप मुलांशी कधीही गैरवर्तन करू नका.

(टीप: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)