ज्योतिषशास्त्रात गजकेसरी राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत हा राजयोग असतो, तो व्यक्ती धनवान असतो आणि त्याला मान-प्रतिष्ठा मिळते असं मानलं जातं. हा राजयोग गुरु आणि चंद्र यांच्या युतीने तयार होत आहे. अशातच आता गुरू मेष राशीत भ्रमण करत आहे आणि ७ ऑगस्ट रोजी चंद्र मेष राशीत भ्रमण करणार आहे. त्यामुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. ज्या राजयोगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. यातील ३ राशी अशा आहेत, ज्या या काळात भाग्यवान ठरू शकतात. तर त्या ३ राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मीन रास (Meen Zodiac)
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरू शकतो. कारण मीन राशीच्या लोकांच्या गोचर कुंडलीत धनाच्या स्थानी हा राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच तुमची आर्थिक प्रगतीही होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या बोलण्यातही प्रभाव दिसेल, ज्यामुळे लोक प्रभावित होऊ शकतात. या काळात तुम्हाला तुमच्या क्षेत्रात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात. ज्या लोकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित आहे त्यांना चांगला लाभ मिळू शकतो.
कर्क रास (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी गजकेसरी राजयोग फायदेशीर ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या कर्म स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. तसेच तुम्हाला मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक प्रगती होऊ शकते. दुसरीकडे, जे बेरोजगार आहेत त्यांना नोकऱ्या मिळू शकतात. तसेच, जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला यावेळी चांगली ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. तसेच, या काळात तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करू शकता.
हेही वाचा- कमी वयात झटपट श्रीमंत होतात ‘या’ राशींचे लोक? लक्ष्मीच्या कृपेने आयुष्यभर प्रचंड संपत्ती कमावू शकतात
सिंह रास (Leo Zodiac)
गजकेसरी राजयोग तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. कारण हा राजयोग तुमच्या गोचर कुंडलीच्या नवव्या स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला नशीबाची साथ मिळू शकते. तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुम्हाला परदेशात शिक्षण घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी अधिकारी तुमच्यावर खूश होतील ज्यामुळे तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी मिळू शकते. या काळात तुम्ही घरात कोणताही शुभ किंवा धार्मिक कार्यक्रम करू शकता.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)