Chanakya Niti For Money: जीवनात अपार धन-संपत्ती मिळवणे हे प्रत्येक जणांचं स्वप्न असतं. त्याला आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासू नये आणि तो आपलं जीवन सुख-सुविधांनी जगू शकेल, यासाठी नेहमी धडपड करत असतो. काही लोक त्यांच्या जीवनात सर्व सुखसोयी मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करतात. मात्र, आचार्य चाणक्य यांच्या मते, देवी लक्ष्मी कोणत्याही व्यक्तीच्या घरात येत नाही. आचार्य चाणक्य, ज्यांना कौटिल्य म्हणून ओळखलं जातं, त्यांनी एक नीतिशास्त्र रचलं होतं. यात त्यांनी समाजाला योग्य जीवन जगण्याचा सल्ला दिला आहे.
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात पैसा, स्त्रिया, वैवाहिक जीवन यासह जवळजवळ प्रत्येक विषयावर काही सल्ला आणि सूचना दिल्या आहेत. आचार्य चाणक्य लिखित ‘चाणक्य नीति’ या पुस्तकात मानवी समाजाच्या जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे. असं म्हटलं जातं की, जो व्यक्ती चाणक्य नीतिच्या गोष्टी समजून घेतो आणि त्याचा आपल्या जीवनात योग्य वापर करतो, त्याच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात अशा पाच लोकांचा उल्लेख केला आहे, ज्यांच्याकडे देवी लक्ष्मी कधीही टिकत नाही. जाणून घेऊयात अशा लोकांबद्दल…
चुकूनही करू नका ‘या’ चुका; लक्ष्मी कायमची दूर जाते!
- कटू बोलणारे : आचार्य चाणक्य यांच्या मते, ज्याच्या वाणीमध्ये सौम्यता नाही, त्याच्याकडे लक्ष्मी टिकत नाही. कठोर वाणीने इतरांची मने दुखावणाऱ्या लोकांवर लक्ष्मी प्रसन्न होत नाही. कठोर आणि अविचारी बोलणं माणसांना आपल्यापासून दूर करतं.
- अति खाणारे : जे लोक आपल्या गरजेपेक्षा जास्त खातात आणि इतरांच्या हक्काचं देखील खातात, त्यांच्याकडे नेहमी पैशाची कमतरता असते.
- घाणेरडे कपडे परिधान करणारा : आचार्य चाणक्य यांच्यानुसार जो व्यक्ती स्वच्छतेची काळजी घेत नाही आणि घाणेरडे कपडे घालतो, त्यावरही देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही.
- आळशी: आचार्य चाणक्य जी मानतात की, आळशी लोक कधीही श्रीमंत होऊ शकत नाहीत. कारण असे लोक त्यांच्या आळशीपणामुळे कोणतेही काम वेळेवर पूर्ण करू शकत नाहीत. मात्र, नंतरच्या आयुष्यात या लोकांना खूप पश्चातापही होतो.
- ज्यांची दिनचर्या अनियमित असते: चाणक्यांच्या मते, लोक सूर्योदयानंतर झोपतात, त्यांच्यावर देवी लक्ष्मी कधीच प्रसन्न होत नाही. धनाची देवी अशा लोकांसोबत कधीच सोबत राहत नाही.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे.)