सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांचे मुंबईमध्ये निधन झाले आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनांनंतर काही दिवसातच संगीतप्रेमींना दुसरा धक्का बसला आहे. बप्पी लहरी यांच्या डिस्को गाण्यांसोबतच त्यांचा सोन्याने मढलेला हटके लुक देखील तितकाच प्रसिद्ध होता. बप्पी लहरी यांचं सोन्याप्रतीचं प्रेम नेहमीच कुतूहलाचा विषय ठरला आहे.

बप्पी लहरी यांनी स्वतः, इतके सोने परिधान करण्यामागचे कारण सांगितले होते. त्यांनी म्हटलं होतं की सोनं त्यांच्यासाठी खूपच भाग्यवान आहे. ज्योतिष शास्त्रानुसार काही राशीसाठी सोने परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सोन्याचे दागिने परिधान केल्याने या लोकांचे नशीब बदलू शकते. बप्पी लहरी यांच्या धनु राशीचा देखील यात समावेश आहे. जाणून घेऊया धनु राशी व्यतिरिक्त इतर कोणत्या राशीसाठी सोने शुभ मानले जाते.

खोटं बोलण्यात पटाईत असतात ‘या’ राशीच्या व्यक्ती; कधीही देऊ शकतात धोका

मेष रास :

मेष राशीच्या लोकांसाठी सोने फारच शुभ असते. खास करून सोन्याची अंगठी घातल्याने या व्यक्तींचे साहस आणि पराक्रम वाढते. भाग्य चांगले होते. तसेच, नातीही मजबूत होतात. जर तुमच्यावर कर्जाचा बोजा असेल तर काही दिवसात तुमची त्यातून सुटका होईल आणि तुमचे उत्पन्न वाढेल.

सिंह रास :

सिंह राशीच्या लोकांसाठी सोने भाग्यवान आहे. या लोकांनी सोन्याचे दागिने, विशेषतः सोन्याची अंगठी परिधान करावी. असे केल्याने नोकरी-व्यवसायात प्रगती होते. धनलाभ होतो. उर्जा आणि उत्साह वाढल्याने प्रत्येक गोष्टीत यश मिळते.

कन्या रास :

सोन्याच्या अंगठी व्यतिरिक्त कन्या राशीच्या लोकांनी सोन्याची चेन किंवा ब्रेसलेट घालणे देखील चांगले आहे. यामुळे जीवनातील समस्या एक-एक करून कमी होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते. जीवनात धन आणि ऐश्वर्य वाढते.

‘या’ व्यक्ती आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही; मार्गात येतात अनेक अडथळे

धनु रास :

धनु राशीच्या लोकांसाठी सोने परिधान करणे अत्यंत शुभ असते. यामुळे त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. गुरु ग्रह शुभ फल देतो. त्यामुळे त्यांना खूप नाव-प्रसिद्धी मिळते. या व्यक्ती अपार धन-संपत्तीचे मालक बनतात. तसेच ते आयुष्यात उच्च दर्जा आणि आनंद प्राप्त करतात. त्यांच्या आयुष्यात कधीही कशाचीच कमतरता नसते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.)