ज्योतिषशास्त्रात राशींची संख्या बारा आहे. तर नऊ ग्रह ठराविक कालावधीनंतर राशी बदल करत असतात. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली राशी बदलतो, तेव्हा त्याचा मानवी जीवनावरही परिणाम होतो. काहींसाठी हा बदल शुभ तर काहींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांची स्थिती, घरे, नक्षत्र, राशी अनेक प्रकारचे परिणाम देतात. या सर्वांचा एक ना एक प्रकारे व्यक्तीवर परिणाम होत असतो. व्यक्तीच्या जीवनातील चढ-उतारांमध्ये, ग्रहांची स्थिती आणि दशा यांच्यातील संबंध दर्शवितात. गोचर म्हणजे हालचाल करणे. गो म्हणजे नक्षत्र किंवा ग्रह आणि चर म्हणजे चालणे. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून सूर्यापासून राहू केतूपर्यंत सर्व ग्रहांची स्वतःची गती आहे. आपापल्या गतीनुसार सर्व ग्रहांना राशीमध्ये फिरण्यासाठी वेगवेगळा वेळ लागतो. नवग्रहांमधील चंद्राचे संक्रमण सर्वात कमी कालावधीचे असते कारण त्याचा वेग वेगवान असतो. तर शनीच्या संथ गतीमुळे शनीचे संक्रमण अवधी सर्वात जास्त आहे.

न्यायदेवता शनिदेव देखील राशी बदलणार आहे. शनिदेवांचा राशी बदल ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून खूप महत्वाचे आहे. शनि सध्या मकर राशीत आहे. शनि ग्रह राशी बदलतो तेव्हा काही राशींवर शनी साडेसाती सुरू होते तर काही राशींवर शनि अडीचकी सुरू होते. गेल्या वर्षी शनिदेवांनी राशी बदलली नव्हती. शनि साडेसातीचे तीन चरण असतात. पहिल्या चरणात शनि मानसिक त्रास देतात. दुसऱ्या चरणात मानसिक, आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्याच वेळी, तिसऱ्या चरणात, शनी साडेसतीमुळे होणारे त्रास हळूहळू कमी होऊ लागतात. या चरणात शनि व्यक्तीला आपली चूक सुधारण्याची संधी देतो. या तीन टप्प्यांपैकी साडेसतीचा दुसरा टप्पा सर्वात वेदनादायक मानला जातो. सध्या शनि मकर राशीत बसला आहे, त्यामुळे मकर, कुंभ आणि धनु राशीत शनीची साडेसाती सुरू आहे. मकर राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू असताना, पहिला टप्पा कुंभ राशीत तर शेवटचा टप्पा धनु राशीत सुरू आहे. आता २९ एप्रिल २०२२ रोजी शनि पुढील राशी बदल करेल. या काळात मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल.

एप्रिल २०२२

ग्रहराशी
सूर्यमहिन्याच्या सुरुवातीला मीन राशीत. १४ एप्रिलपासून मेष राशीत
मंगळमहिन्याच्या सुरुवातील मकर राशीत, ७ एप्रिलपासून कुंभ राशीत
बुधमहिन्याच्या सुरुवातील मीन राशीत, ८ एप्रिलपासून मेष राशीत, २४ एप्रिलपासून वृषभ राशीत
गुरुमहिन्याच्या सुरुवातीला कुंभ राशीत, १३ एप्रिलपासून मीन राशीत
शुक्रमहिन्याच्या सुरुवातील कुंभ राशीत, २७ एप्रिलपासून मीन राशीत
शनिमहिन्याच्या सुरुवातीला मकर राशीत, २९ एप्रिलपासून कुंभ राशीत
राहुमहिन्याच्या सुरुवातीला वृषभ राशीत, १२ एप्रिलपासून मेष राशीत
केतुमहिन्याच्या सुरुवातीला वृश्चिक राशीत, १२ एप्रिलपासून तुला राशीत
चंद्रप्रत्येक सव्वा दोन दिवसात राशी बदलणार

Solar Eclipse 2022: वर्षातील पहिलं सूर्यग्रहण एप्रिलमध्ये होणार, ‘या’ राशींच्या लोकांनी जरा सांभाळून

कुंभ राशीच्या लोकांनी सावधानता बाळगावी : शनिच्या राशी बदलामुळे कुंभ राशीच्या लोकांवर साडेसातीचे दुसरे चरण सुरू होणार आहे. त्यामुले या राशीच्या लोकांना सर्व प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागू शकते. दुस-या टप्प्यात व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनात चढ-उतार येतात, तसेच त्याला शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. शनि हा कुंभ राशीचा अधिपती ग्रह असल्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी दुसरा टप्पा बाकीच्या राशीच्या तुलनेत कमी त्रासदायक असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मकर आणि मीन राशीवर प्रभाव: शनीच्या संक्रमणाने मकर राशीच्या लोकांवर शनि साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. मीन राशीवर पहिला टप्पा ज्याला उदय अवस्था देखील म्हटले जाते ती सुरू होईल. दुसरीकडे धनु राशीच्या लोकांना शनी साडेसातीपासून मुक्तता मिळेल. या दरम्यान कर्क आणि वृश्चिक राशीचे लोक शनि ढय्याच्या नियंत्रणात येतील, त्यानंतर मिथुन आणि तूळ राशीच्या लोक ढैय्याच्या प्रभावापासून मुक्त होतील.