9th April 2024 Panchang & Marathi Horoscope: वैदिक पंचांगानुसार, चैत्र महिन्याची सुरुवात आज ९ एप्रिलपासून होत आहे. चैत्र शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडव्यापासून मराठी नववर्ष सुरु झालं आहे. तसंच तिथीनुसार आजपासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरु झाली आहे. काल म्हणजेच ८ एप्रिलला रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी नवरात्रीची तिथी आरंभली असून पुढील नऊ दिवस देशभरात अनेकठिकाणी नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. आजचा दिवस ग्रहांच्या स्थितीनुसार तसेच राजयोगांनुसार सुद्धा अत्यंत शुभ असणार आहे. पंचांगानुसार, आज दिवसभर शश राजयोग, अमृत सिद्धी योग व सर्वार्थ सिद्धी योग जागृत असणार आहे. आजच्या या शुभ दिनी तुमच्या राशीच्या नशिबात कसा गोडवा येऊ शकतो हे पाहूया..

९ एप्रिल पंचांग: गुढी पाडवा व चैत्र नवरात्री विशेष राशी भविष्य

मेष:-कामाचा व्याप वाढेल. क्षुल्लक अडथळ्यातून मार्ग काढा. अति श्रमामुळे थकवा जाणवेल. बौद्धिक ताण जाणवेल. जामीनकीच्या व्यवहारात अडकू नका.

25th May Panchang Marathi Rashi Bhavishya Mesh To Meen Daily Horoscope
२५ मे पंचांग, शनिवार: ज्येष्ठा नक्षत्र व सिद्ध- साध्य योगाचा प्रभाव तुमच्या राशीत आज काय बदलणार? १२ राशींचे भविष्य वाचा
41 days earn lots off money Due to the tremendous influence of Mars
४१ दिवस नुसता पैसा; मंगळाच्या जबरदस्त प्रभावाने ‘या’ तीन राशी होणार प्रचंड मालामाल
People of this zodiac sign will get a lot of money
१४ जूनपर्यंत होणार भरभराट! सूर्य चमकवणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे भाग्य; कमवणार बक्कळ पैसा
200 Years Later Shani Jayanti 2024 Nakshtra Gochar
चौफेर धनवर्षाव होणार! २०० वर्षांनी शनी जयंतीला ‘हा’ दुर्मिळ योगायोग; तीन राशींच्या कुंडलीत ‘या’ रूपात वसेल लक्ष्मी
Jupiter's movement will give wealth, happiness and prosperity
पुढचे २४ दिवस महत्त्वाचे! देवगुरू बृहस्पतींची चाल ‘या’ तीन राशींना देणार ऐश्वर्य, सुख-समृद्धी अपार
shukra gochar 2024 venus transit in krittika nakshatra positive impact on these zodiac sign
शुक्रकृपेने सहा दिवसांनंतर ‘या’ ३ राशी होणार मालामाल!कृत्तिका नक्षत्रातील प्रवेशाने वाढेल मान-सन्मान अन् प्रतिष्ठा?
Shani Jayanti 2024
सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याने ‘या’ राशींच्या नशिबाला कलाटणी? शनीदेवाच्या कृपेने ‘या’ रूपात मिळू शकते श्रीमंती
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : ५ दिवसानंतर सूर्याचं होणार संक्रमण! ‘या’ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ; मिळेल बक्कळ पैसा

वृषभ:-झोपेची तक्रार जाणवेल. मनातील निराशा बाजूस सारावी. अनाठायी खर्च करू नये. तरुण वर्गाची मते विचारात घ्याल. कामे वेळेत पार पडतील.

मिथुन:-व्यावसायिक वृद्धीच्या दृष्टीने पाऊल उचलाल. आरोग्यात सुधारणा होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. चांगल्या संगतीत दिवस जाईल. किरकोळ दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका.

कर्क:-दिलेली योग्य वेळ पाळता येईल. मनाजोगी खरेदी करता येईल. बौद्धिक मूल्यमापन कराल. विशिष्ट धोरण ठेवून वागाल. बौद्धिक छंदांसाठी वेळ काढावा.

सिंह:-मानसिक स्थैर्य जपावे. काही गोष्टींत कंजूषपणा दाखवाल. कफ विकाराचा त्रास जाणवेल. अती विचार करू नये. भागिदारीतून चांगला फायदा होईल.

कन्या:-जोडीदाराच्या सुरक्षितपणाचे कौतुक कराल. सहकार्‍यांची उत्तम प्रकारे साथ मिळेल. बौद्धिक दृष्टीकोन ठेवाल. व्यापारी वर्गाला लाभ होईल. हाताखालील लोकांचे सहकार्य मिळेल.

तूळ:-छंद जोपासला वेळ काढाल. कौटुंबिक बाबतीत शांतता ठेवावी. जोडीदाराचा तुमच्यावर प्रभाव राहील. काही कामे विनासायास पार पडतील. शेअर्स मध्ये गुंतवणूक कराल.

वृश्चिक:-तुमच्यातील धैर्य वाढीस लागेल. कर्तबगारीला नवीन वाटा फुटतील घरगुती वातावरण प्रसन्न असेल. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी. भावंडांना मदत करावी लागेल.

धनू:-मागचा पुढचा विचार करून खर्च करा. गरज असेल तरच शब्दांचा वापर करा. जवळचे मित्र भेटतील. जोडीदाराशी क्षुल्लक कारणांवरून मतभेद संभवतात. कौटुंबिक खर्चाचा आकडा पुनर्विचारात घ्या.

मकर:-काही गोष्टींचा चंग बांधावा. क्षुल्लक गोष्टींवरून होणारा गैरसमज टाळावा. तुमच्यातील कार्य कुशलता वाढीस लावावी. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. स्वत:साठी वेळ काढा.

कुंभ:-डोळ्यांची वेळेवर तपासणी करावी. जुनी कामे पुन्हा सामोरी येऊ शकतात. खर्चाचा आकडा कोलमडू देऊ नका. आधुनिक गोष्टी समजून घ्याव्यात. अघळ-पघळ बोलणे टाळा.

मीन:-मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल. चित्रकलेची आवड जोपासाल. मानसिक चंचलता जाणवेल. मित्रमंडळींची नाराजी दूर करावी. वादाच्या मुद्दयात अडकू नका.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर