Daily Horoscope, 8 November : आज ८ नोव्हेंबर २०२४ रोजी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी आहे. सप्तमी तिथि रात्री ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत राहील. शुक्रवारी दुपारी १२ वाजून ०३ मिनिटांपर्यंत सर्व कार्यात यश मिळवून देणारा रवि योग जुळून येणार आहे. तसेच आज उत्तराषाढ़ा नक्षत्रात दुपारी १२ वाजून ३ मिनिटांपर्यंत जागृत असणार आहे. तर राहू काळ १० वाजून ३० मिनिटांनी सुरु होईल ते १२ वाजेपर्यंत असेल. तर आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार आहे हे आपण जाणून घेऊया…

८ नोव्हेंबर पंचांग व राशिभविष्य :

मेष:- कामाच्या ठिकाणी चांगला समन्वय साधला जाईल. स्वभावातही चांगले बदल दिसून येतील. चारचौघात तुमचा प्रभाव पडेल. वडीलांचा मोलाचा सल्ला मिळेल. सर्व कामांचा ताळमेळ साधावा.

वृषभ:- आज नशीब आजमावण्याची संधी मिळेल. आज सुरू केलेले काम फायदेशीर ठरेल. मनात परोपकाराची भावना जपाल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. थोरांचा आशीर्वाद मिळेल.

मिथुन:- मनाची चलबिचलता जाणवेल. एकाच वेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका. जुन्या विचारात अडकून पडू नका. अचानक धनलाभाची शक्यता. वाहन चालवताना काळजी घ्यावी.

कर्क:- वैवाहिक जीवनात अनुकूलता येईल. मनातील इच्छा पूर्ण कराल. फार हट्टीपणा करू नका. कुटुंबातील व्यक्तींशी चर्चेला अधिक प्राधान्य द्यावे. जनसंपर्क वाढेल.

सिंह:- आरोग्याकडे लक्ष द्यावे. पोटाचे त्रास संभवतात. वातूळ पदार्थ खाणे टाळावे. हित शत्रूपासून सावध राहावे. योग साधनेवर भर द्यावा.

कन्या:- आजचा दिवस मजेत घालवाल. चांगले शैक्षणिक परिणाम मिळतील. प्रेम जीवनाला बहर येईल. जुगारातून लाभ संभवतो. मित्रांसोबत फिरायला जाल.

तूळ:- उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. घराची साफसफाई कराल. दिवस प्रसन्नतेत जाईल. घरच्यांशी सुसंवाद साधाल. जवळचा प्रवास कराल.

वृश्चिक:- सामाजिक स्तरावर सक्रिय राहाल. स्वभावात सौम्यता ठेवावी. मित्रांशी सलोखा वाढेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. आपले मत स्पष्टपणे मांडाल.

धनू:- गोड बोलून कामे करून घ्याल. सर्वांची आपुलकीने चौकशी कराल. मनातील कडवटपणा दूर करता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो.

मकर:- आरोग्यात सुधारणा होईल. मानसिक स्थैर्य लाभेल. आवडीच्या कामात मन गुंतवावे. समोरील अडचण सहज दूर करू शकाल. हातातील कामातून यश येईल.

कुंभ:- कामाच्या ठिकाणी सतर्क राहावे. राजकारणापासून दूर राहावे. अनावश्यक खर्च टाळावा. दूरच्या कामातून लाभ संभवतो. मनात चुकीच्या विचारांना थारा देऊ नका.

मीन:- नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. जवळच्या मित्राजवळ मन मोकळे करावे. कामे जलद गतीने पूर्ण होतील. व्यापारी वर्ग खुश असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(ज्योतिषी विद्याधर करंदीकर )