Guru Atichari And Shani Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी वक्री आणि अतिचारी गतीने भ्रमण करते ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. गुरू ग्रह गोचर करून मिथुन राशीमध्ये १४ मे ला प्रवेश करणार आहे आणि अतिचारी गतीने चालून ५ महिन्यानंतर कर्क राशीमध्ये १८ ऑक्टोबरला प्रवेश करणार आहे. या दरम्यान कर्मानुसार फळ देणारा शनि सुद्धा वक्री स्थितीत राहणार. गुरूच्या अतिचारी आणि शनि देवाच्या वक्री स्थितीचा प्रभाव देश जगावर तसेच बारा राशींवर दिसून येईल.जाणून घेऊ या त्यांचा प्रभाव कसा राहीन?

शनि वक्री आणि गुरु अतिचारीचा पडणार १२ राशींवर प्रभाव

गुरू अतिचारी आणि शनिदेव वक्री झाल्याने वृषभ, मिथुन, मीन, तुळ आणि मकर राशीच्या लोकांना लाभ होऊ शकतो. या लोकांना नोकरीमध्ये पदोन्नतीमध्ये योग जुळून येईल. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली नोकरी मिळू शकते. तसेच व्यावसायिकांना चांगला धनलाभ होऊ शकतो. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. या लोकांना चांगल्या संधी मिळू शकतात.

जीवनशैलीमध्ये सकारात्मक परिवर्तन येईल. प्रेम संबंधांमध्ये गोडवा दिसून येईल. आर्थिक योजना यशस्वी होतील आणि कला क्षेत्रात प्रसिद्धी तसेच सन्मान प्राप्त होईल. अविवाहित लोकाना विवाहाचा प्रस्ताव येऊ शकतो. मेष, कर्क, धनु आणि कुंभ राशीच्या लोकांना शनि देवाची वक्री आणि गुरूचे अतिचारी होणे मध्यम स्वरुपाचे लाभदायक ठरेन. तसेच सिंह, वृश्चिक राशीच्या लोकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.

देश-जगावर शनि वक्री आणि गुरु अतिचारीचा प्रभाव

शनि वक्री आणि गुरू अतिचारीचा प्रभाव राजनितीमध्ये धक्कादायक ठरू शकतो. मोठ्या मोठ्या पदावर असणाऱ्या लोकांना अडचणीचा सामना करावा लागू शकतो.

तसेच सत्तेत असणाऱ्या बीजेपी आपल्या नेतृत्वात आणि मंत्रिमंडळात बदल करू शकतात. वातावरणात बदल दिसून येईल.अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण दिसून येईल. गुरूच्या अतिचारीचा प्रभाव घटस्फोटाच्या वाढत्या संख्येवर दिसून येईल. शनिचे वक्री होणे आणि शुभ ग्रह गुरुच अतिचारी होणे असामान्य वर्षाचा योग निर्माण करत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)