Jupiter Uday 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये बृहस्पती गुरुदेव यांच्या चालीत होणारा बदल अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण बृहस्पति हा वृद्धी आणि समृद्धीचा कारक आहे. एप्रिलच्या सुरुवातीला गुरु ग्रहाचा उदय होणार आहे. यामुळे गुरू ग्रहाचा प्रभाव सर्व राशींवर आणि मानवी जीवनावर दिसेल. दुसरीकडे, बृहस्पति उदय होऊन धन राजयोग बनवत आहे. यामुळे अशा तीन राशी आहेत, ज्यांना गुरू ग्रहाचा उदय होताच अचानक संपत्ती आणि सुख-समृद्धी वाढण्याची शक्यता दिसत आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..

मीन राशी

धन राजयोग तयार झाल्यामुळे मीन राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून दुसऱ्या भावात उदयास येईल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली सुधारू शकते. तसंच यावेळी तुम्हाला तुमचे अडकलेले पैसे परत मिळतील. तसेच जे लोक व्यवसाय करत आहेत त्यांना या काळात चांगला नफा होईल. यासोबतच ज्यांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना परदेशात जाण्याची संधी मिळेल. तसंच व्यावसायिकांना बऱ्याच काळापासून रखडलेले पैसे परत मिळतील. दुसरीकडे, बृहस्पति हा तुमच्या राशीचा स्वामी आहे. म्हणूनच तुम्ही पुखराज देखील घालू शकता, जो तुमचा भाग्यशाली दगड आहे.

कर्क राशी

धन राजयोग तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकतो. धन राजयोग बनल्याने व्यवसाय आणि करिअरमध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. कारण बृहस्पति तुमच्या राशीतून दहाव्या भावात प्रवेश करणार आहे. त्यामुळे जे बेरोजगार होते त्यांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. तसंच जे व्यापारी आहेत त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात जी लोक अविवाहित आहेत त्यांचा विवाह होण्याची शक्यता आहे. तसंच उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांना परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. जी लोकं नोकरी किंवा व्यवसाय कार्य करत आहेत त्यांना चांगले यश आणि पदोन्नती होऊ शकते. तुम्ही लोक मून स्टोन घालू शकता, जो तुमच्यासाठी लकी स्टोन ठरू शकतो.

(हे ही वाचा: ७ तासानंतर ‘या’ राशींचे नशिब पालटणार? सुर्यदेवाच्या कृपेने तुम्हीही होऊ शकता श्रीमंत)

सिंह राशी

धन राज योग तयार झाल्यामुळे सिंह राशीच्या लोकांना पैसा आणि नशिबाची भक्कम साथ मिळेल. कारण गुरु ग्रह तुमच्या राशीतून नवव्या भावात उदयास येणार आहे. ज्याला भाग्य आणि परदेशी स्थानाचा मान दिला जातो. त्यामुळे यावेळी तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. तसंच तुम्ही व्यवसाय किंवा इतर कोणत्याही कामासाठी प्रवास करू शकता. याकाळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे )