Where is Love Line On Your Palm: प्रेम कुणाला नको असतं? आपली काळजी करणारं, आपल्याला हवं नको ते पाहणारं, आपल्यावर चिडणारं, रुसणारं एक हक्काचं कोणीतरी सर्वांनाच हवं असतं. अनेकदा अनेकजण आपल्याच चुकांमुळे आपला सोन्यासारखा जोडीदार गमावून बसतात तर काही जण नियतीच्या खेळापुढे हरतात. जर आपल्याला कोणीतरी आधीच येणाऱ्या संकटांविषयी सूचित केलं तर किती बरं होईल, म्हणजे अमुक व्यक्ती आपल्यासाठी योग्य नाही किंवा तमुक व्यक्तीबरोबर राहिल्याने आपले प्रेम यशस्वी होणार नाही याचा अंदाज घेता आला तर.. तसे या गोष्टी सांगणारे अनेक संकेत समोरची व्यक्तीच आपल्याला देत असते पण काहीवेळा या सूचना तुमच्याच हातात असतात. हातात म्हणजे खरोखरच तुमच्या भाग्यरेषाही प्रेमसंबंधित सल्ले देऊ शकतात. या प्रेम रेखांविषयी आज आपण माहिती करून घेऊयात…

हस्तरेखा व ज्योतिषशास्त्राच्या माहितीनुसार आपल्या हातावर एक हृदय रेखा असते. या रेषेवरून आपल्याला प्रेम, विवाह व संतती प्राप्तीविषयी अनेक उत्तरे मिळू शकतात. तळहातावर करंगळीच्या खाली बुध पर्वत असतो ज्यावर हृदय रेखा असते. याला विवाह किंवा प्रेम रेषा असेही म्हंटले जाते. या रेषेचा संबंध कमी अधिक प्रमाणात व्यवहारांशी सुद्धा असल्याचे सांगितले जाते.

ज्या व्यक्तींच्या तळहातावरील हृदय रेष ही तुटक असते त्यांना प्रेम संबंधात धोका अनुभवावा लागू शकतो. बहुतांश वेळेस जोडीदाराकडूनच फसवणूक केली जाऊ शकते. अशा प्रकारची मंडळी फार लगेच एखाद्यावर विश्वास ठेवून प्रेम करू लागतात पण त्यांच्या याच वेळ न घेण्यामुळे समोरची व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित होण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आपल्याला जर लगेचच माणसांची पारख करता येत नसेल तर अशा व्यक्तींनी नव्या नात्यात पडण्याआधी स्वतःला किमान दोन आठवडे वेळ द्यावा.

शनिच्या साडेसातीतुन मुक्तीसाठी खास आहे शनि प्रदोष तिथी; यंदाचा मुहूर्त, शुभ मंत्र, महत्त्व जाणून घ्या

फार कमी व्यक्तींच्या हातावरील हृदय रेखा ही सलग असते, अशा व्यक्ती जोडीदाराच्या बाबत खूपच नशीबवान असतात. त्यांना एकाच जोडीदाराचे अखंड प्रेम मिळण्याचे योग असतात. अशी नाती टिकण्यामागे केवळ हस्तरेखाच नव्हे तर अन्यही कारणे असतात. सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांच्या हृदय रेखा सलग किंवा कमी प्रमाणात तुटक असतात त्यांचा स्वभावही जुळवून घेणारा असू शकतो. याच स्वभावामुळे ही मंडळी जोडीदाराची उणीदुणी कमी काढतात व परिणामी प्रेम टिकून राहण्यास मदत होऊ शकते.

२०२३ मध्ये भयंकर प्रलयाचे संकेत! बाबा वेंगा यांच्या ‘या’ ५ भविष्यवाण्या खऱ्या झाल्या तर आपलंही आयुष्य..

हृदय रेखा ही कमी अधिक प्रमाणात तुमच्या बुद्धिमत्तेची सुद्धा माहिती देत असते, म्हणजेच ज्यांच्या हातावरील हृदय रेखा ही लाल किंवा गडद असते अशी मंडळी बुद्धीने तल्लख मानली जातात मात्र त्यांना वाईट सवयी पटकन लागण्याची शक्यता असते. तुमच्याही हातावरील हृदय रेखा कशी आहे हे तपासून पाहू शकता पण एक लक्षात घ्या ही सर्व माहिती केवळ एक पाया आहे, यामुळे घाबरून जाण्याची किंवा ताण घेण्याची गरज नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप- वरील लेख हा माहितीपर असून यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)