Shasha Raja Yoga: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या राशी परिवर्तनासोबत त्यांचे नक्षत्र परिवर्तनदेखील होते. शनी ग्रहाला न्याय आणि कर्माची देवता म्हणून ओळखले जाते. शनी जवळपास एका राशीत अडीच वर्षे राहतो. शनीला संपूर्ण राशिचक्र पूर्ण करण्यासाठी ३० वर्षांचा काळ लागतो. सध्या शनी त्याची स्वराशी असलेल्या कुंभ राशीत विराजमान असून, २९ जूनपासून शनी याच राशीत वक्री झाला आहे. शनीची ही वक्री चाल काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप उत्तम असेल. शनीच्या वक्री चालीने शश राजयोग निर्माण होत आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील.

वृषभ

या राशीच्या व्यक्तींसाठी हा राजयोग खूप लाभकारी सिद्ध होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील.

वृश्चिक

शश राजयोगामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अनुकूल असेल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील. कर्ज कमी होईल. नोकरी, व्यवसायात फायदा होईल. कामाच्या निमित्ताने दूरचे प्रवास करावे लागतील. तुमचे ध्येय प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. व्यवसायात बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावे लागेल. वैवाहिक जीवनातही मतभेद होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

हेही वाचा: मंगळ देणार भरपूर पैसा! वृषभ राशीत प्रवेश होताच ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य

कुंभ

या राशीच्या व्यक्तींसाठी शश राजयोगाचा चांगला फायदा होईल. शनीच्या वक्री होण्याने मानसिक आणि शारीरिक तणाव कमी होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. भागीदारीमध्ये सुरू केलेला व्यवसाय खूप फायदा देणारा ठरेल. तुमचे वैवाहिक जीवन सुखमय राहील. जुने वाद मिटतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)