मेष:-

मानसिक अस्वास्थ्याला बळी पडू नका. गायन कलेचे कौतुक केले जाईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. आर्थिक प्रश्न मार्गी लागतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल.

वृषभ:-

हौस पूर्ण करता येईल. मैत्रीचे संबंध जोडले जातील. इतरांवर तुमचा चांगला प्रभाव पडेल. कलेचे आवड जोपासता येईल. मानसिक ताणतणाव दूर सारावा.

मिथुन:-

आर्थिक निर्णय घाईने घेऊ  नका. स्त्री वर्गापासून सावध राहावे. क्षणिक मोहाला बळी पडाल. अनाठायी खर्च केला जाईल. मनातील इच्छेला महत्त्व द्याल.

कर्क:-

मित्र परिवारात वाढ होईल. दिवस कामात व गडबडीत जाईल. सर्वांना आनंदाने आपलेसे कराल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. व्यावसायिक लाभाने खुश व्हाल.

सिंह:-

कामातून मानाची जागा मिळवाल. उत्कृष्ट बोलण्याने इतरांचे मन जिंकून घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. चैनीच्या वस्तू खरेदी कराल. कलाकारांचा नाव लौकिक वाढेल.

कन्या:-

कला जोपासायला वेळ काढता येईल. धार्मिक कामात मदत कराल. विशाल दृष्टिकोन ठेवून वागाल. कामातील अडथळे दूर होतील. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील.

तूळ:-

जोडीदाराबरोबर क्षुल्लक कारणांवरून वाद संभवतो. आपलेच मत खरे करण्याचा प्रयत्न कराल. भागीदारीच्या व्यवसायात सबुरीने वागावे. वारसाहक्काची कामे फायदेशीर ठरतील. अचानक धनलाभ संभवतो.

वृश्चिक:-

एकमेकांच्या मताचा आदर करावा. आपले मत शांतपणे मांडावे. सहकार्‍यांना सोबत घेऊन चालावे. हाताखालील लोकांवर लक्ष ठेवावे. प्रवासात सावधानता बाळगावी.

धनू:-

लोकोपवादाकडे दुर्लक्ष करावे. आळस झटकून कामाला लागावे. रेस सट्टा सारख्या व्यवहारात सतर्क रहा. व्यसनाच्या आहारी जाऊ नका. नातेवाईकांची मदत मिळेल.

मकर:-

प्रेमाच्या दृष्टीने मैत्री लाभेल. व्यवहारी भूमिका घ्यावी लागेल. तुमच्या छंदाचे कौतुक केले जाईल. गप्पा गोष्टी करण्यामध्ये गुंग व्हाल. सहवासातून नवीन संबंध दृढ होतील.

कुंभ:-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

घरगुती सुख सोईंकडे लक्ष द्याल. कौटुंबिक कटुता टाळण्याचा प्रयत्न करा. घरातील  टापटि‍पी बाबत आग्रही राहाल. जवळच्या ठिकाणाला भेट देता येईल. क्षुल्लक गोष्टींवरून त्रागा करू नये.

मीन:-

नातेवाईकांशी सलोखा वाढेल. कलेची आवड जोपसाता येईल. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. खाण्यापिण्याची आवड दर्शवाल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर