Today Rashi Bhavishya, 06 August 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
11th April 2024 Panchang Guruvaar Marathi Rashi Bhavishya
११ एप्रिल, गुरुवार पंचांग: आज आयुष्यमान, सौभाग्य योग; तुमच्या राशीच्या कुंडलीत आज कोणत्या रूपात लाभेल गौरी कृपा?
Chaitra Navratri 2024 From Gudhi Padwa Lakshmi Blessing These Four Zodiac Signs
चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?

जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूती येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.

सिंह (Leo Horoscope Today ):-

तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.

तूळ (Libra Horoscope Today ):-

गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ टाळावी. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा.

मीन (Pisces Horoscope Today ):-

जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर