Today Rashi Bhavishya, 13 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.
मेष (Aries Horoscope Today ):-
जुनी रखडलेली कामे सामोरी येतील. मेहनतीचे चीज होईल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. मित्र गरजेच्या वेळी धावून येतील. हास्य विनोदात दिवसाचा उत्तरार्ध जाईल.
वृषभ (Taurus Horoscope Today ):-
विद्यार्थ्यानी आळस झटकून टाकावा. घरातील कामांमध्ये गुंग व्हाल. स्वच्छतेकडे अधिक लक्ष द्याल. दिनक्रम व्यस्त राहील. गुंतवणुकीचा चांगला पर्याय सापडेल.
मिथुन (Gemini Horoscope Today ):-
हस्तकलेला वाव द्यावा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. बौद्धिक कस लागू शकतो. जोडीदाराच्या सल्ल्याने कृती कराल. कामातील तांत्रिक बदलांकडे लक्ष ठेवा.
कर्क (Cancer Horoscope Today ):-
लोकांना नावे ठेवायला जागा देऊ नका. आपण आपले काम करीत राहा. आवडीनिवडी बाबत आग्रही राहाल. नवीन ओळखी होतील. वरिष्ठांच्या सल्ल्याशिवाय पुढे जाऊ नका.
सिंह (Leo Horoscope Today ):-
कोणत्याही निर्णयात संभ्रम आड आणू नका. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस. विचार करूनच निर्णय घ्या. भाग्याची उत्तम साथ लाभेल. जुगारात लाभ होऊ शकतो.
कन्या (Virgo Horoscope Today ):-
घरासाठी नवीन खरेदी कराल. स्वप्नातून जागे व्हा. जोडीदाराचा सल्ला विचारात घ्या. तडजोडीला पर्याय नाही. खर्चाचा ताळमेळ बसवावा लागेल.
तूळ (Libra Horoscope Today ):-
मधाळ बोलून लोकांना आकर्षित कराल. उत्तम वैचारिक भूमिका घ्याल. दिवस आळसात जाऊ शकतो. शारीरिक ताण जाणवेल. अतिरिक्त बोलणे टाळावे.
वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-
जुन्या गैरसमजुती मनातून काढून टाका. आशावादी दृष्टिकोन कायम ठेवा. साहस करताना सतर्क राहा. नवीन शिकण्याची संधी सोडू नका. प्रेमातील व्यक्तींनी संयम बाळगावा.
धनू (Sagittarius Horoscope Today ):-
सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. धार्मिक गोष्टीत दिवस व्यतीत कराल. वैवाहिक जीवन आनंदी असेल. व्यवसायात प्रगती करता येईल. तरुण वर्गाकडून नवीन गोष्टी शिकाल.
मकर (Capricorn Horoscope Today ):-
आपल्यामुळे इतरांची गैरसोय टाळा. कार्यक्षेत्रात प्रगती कराल. चारचौघांत कौतुकास पात्र व्हाल. क्षुल्लक गोष्टींनी नाराज होऊ नका. मुलांची कृती आनंद दायक असेल.
कुंभ (Aquarius Horoscope Today ):-
अतीअपेक्षा बाळगू नका. मानसिक समतोल साधावा. बोलताना भान राखावे. आर्थिक निर्णय सावधगिरीने घ्यावेत. कौटुंबिक शांतता महत्त्वाची.
मीन (Pisces Horoscope Today ):-
व्यायामाचा कंटाळा करू नका. आहारावर नियंत्रण ठेवा. योग्य संधीसाठी थोडा वेळ द्यावा लागेल. हाता-पायांची काळजी घ्यावी. हाती घेतलेले काम पूर्णत्वास जाईल.
– ज्योतिषी विद्याधर करंदीकर